Rishabh Pant MS Dhoni : धोनी - पंतचे हितगुज! करिअर वाचवण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावरून थेट गाठले दुबई?

MS Dhoni Rishabh Pant Dubai
MS Dhoni Rishabh Pant Dubai esakal
Updated on

MS Dhoni Rishabh Pant Dubai : ऋषभ पंतने बांगलादेश दौऱ्यावरील कसोटी मालिकेत फलंदाजीत चांगली कामगिरी केली. मात्र वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये पंतला लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्याला वनडे आणि टी 20 संघातून नारळ मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंतने थेट आपला गुरू महेंद्रसिंह धोनीला गाठले. तेही थेट दुबईत जाऊन! सोशल मीडियावर धोनी आणि पंतच्या दुबईतील फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

MS Dhoni Rishabh Pant Dubai
David Warner VIDEO : डेव्हिड वॉर्नर ऐतिहासिक डबल धमाका; मात्र लगेचच का सोडावं लागले मैदान?

महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत महेंद्रसिंह धोनी, साक्षी धोनी आणि त्यांच्या जवळचे काही मित्र देखील दिसत आहेत. याच फोटोत ऋषभ पंत देखील असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

MS Dhoni Rishabh Pant Dubai
Ramiz Raja : डच्चू मिळाल्यानंतर रमीझ राजांची पहिली प्रतिक्रिया; सन्मानपूर्वक एक्झिट तरी...

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 साठीचा लिलाव पार पडताच आपल्या मित्रांसोबत दुबईमध्ये सुट्टी घालवण्यासाठी रवाना झाला. सुट्टीदरम्यानही धोनीने आपली मेटॉरगिरी काही सोडली नाही. त्याने भारतीय संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भवितव्य धोक्यात आलेल्या पंतला दुबईत बोलवून घेत त्याला गुरूमंत्र दिला. (Sports Latest News)

येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत पंतसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे. त्यामुळेच पंतने धोनीची शरण घेतली आहे. पंतने यापूर्वीही महेंद्रसिंह धोनीचा सल्ला वेळोवेळी घेतला आहे. यावेळी तर पंतचे संघातील स्थानच धोक्यात आले आहे. आता धोनीचा गुरूमंत्र पंतच्या किती कामी येतो हे येणारा श्रीलंका दौराच ठरवले.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.