इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) नुकतीच संपली आहे. यावेळी आयपीएलचे विजेतेपद एम एस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने जिंकले. चेन्नईने आयपीएल ट्रॉफीवर कब्जा करण्याची ही पाचवी वेळ होती. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातशी झाला. पण या सगळ्यामध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी वेगळ्याच अंदाजात दिसला आहे.
गुरुवारी सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी कारमध्ये बसून भगवद्गीतेचे पठण करताना दिसला. धोनीने हातात भगवद्गीता पकडून गाडीत बसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
आयपीएल 2023 मध्ये चेन्नईचा पहिला सामना गुजरात टायटन्स सोबत झाला होता. या सामन्याच्या 19 व्या षटकात दीपक चहरचा चेंडू थांबवल्यामुळे धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला खेळपट्टीवरच वेदना होऊ लागल्या.
मात्र धोनीने कोणत्याही सामन्यातून विश्रांती घेतली नाही आणि खेळ सुरूच ठेवला. एवढेच नाही तर धोनीला गुडघेदुखीनेही काही काळ त्रास होत आहे. त्यामुळे त्याने उपचारासाठी मुंबईतील क्रीडा ऑर्थोपेडिक तज्ञांचा सल्ला घेतला. फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) काशी विश्वनाथ यांनी बुधवारी ही माहिती दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मागील हंगामात धोनी गुडघ्यावर पट्टी बांधून खेळताना दिसला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंह धोनी याच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या विजेतेपदानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी म्हणाला होता की, चाहत्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यामुळे मी आणखी एक सीझन खेळणे हीच त्यांना माझी भेट असेल फक्त शरीराने साथ द्यावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.