शिक्कामोर्तब! lPL 2023 पूर्वी आनंदाची बातमी; MS Dhoni असणार CSK चा कर्णधार

धोनी IPL खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. धोनी पुन्हा एकदा CSK ची कमान सांभाळताना दिसणार आहे.
ms dhoni lPL 2023
ms dhoni lPL 2023sakal
Updated on

lPL 2023 MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. अशा स्थितीत महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षीही आयपीएल खेळताना दिसणार असल्याचे सीएसकेने निवेदन जारी केले आहे. यासोबतच CSK ने महेंद्रसिंग धोनीची IPL च्या 16 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

ms dhoni lPL 2023
Ind vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का

महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते कारण गेल्या वर्षी त्याने सीझन सुरू होण्याच्या तीन दिवस आधी सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली CSK ची कामगिरी खूपच खराब होती. त्याला हंगामाच्या मधून कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आल. यानंतर धोनीची पुन्हा संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी धोनीच्या बाबत म्हणाला, एमएस धोनी आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ मैदानात उतरणार आहे.

ms dhoni lPL 2023
Mushfiqur Rahim Retirement : बांगलादेश आशिया कपमधून बाहेर पडताच 'या' स्टार खेळाडू घेतली निवृत्ती

आयपीएलच्या 16व्या हंगामाच्या लिलावापूर्वीच रवींद्र जडेजा सीएसकेपासून वेगळे होऊ शकतो. रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की जडेजाच्या मॅनेजरने सीएसकेला कळवले आहे की स्टार अष्टपैलू खेळाडू यापुढे संघाशी संबंधित राहू इच्छित नाही. रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून CSK शी संबंधित सर्व आठवणी पुसून टाकल्या आहेत. एवढेच नाही तर जडेजा आता CSK च्या कोणत्याही अॅक्टिव्हिटीमध्ये दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.