SA vs IND : तीन डाव... 270 धावा अन् 23 विकेट्स; पाच दिवसांची कसोटी दोन दिवसातच संपणार?

SA vs IND
SA vs INDESAKAL
Updated on

SA vs IND : भारताने दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर यंदाची मालिका रोहित सेनेला जड जाणार असं वाटतं होतं. मात्र दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने जोरदार कमबॅक केलं. मोहम्मद सिराजने आफ्रिकेला खिंडार पाडत पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा उडवला.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने चांगली फलंदाजी करत आघाडी घेण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशीचे तिसरे सत्र सुरू झाले त्यावेळी भारतीय संघ शतकी भागीदारीच्या जवळ होता. विराट कोहली देखील 46 धावा करून अर्धशतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर पोहचला होता.

SA vs IND
Surya Kumar Yadav : सूर्या सलग दुसऱ्या वर्षी होणार टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर...? स्पर्धेत झिम्बाब्वे, युगांडाचे खेळाडू

मात्र तिसऱ्या सत्रात एन्गिडी आणि रबाडाने भारतीय संघाची अवस्था अत्यंत वाईट करून टाकली. या दोघांनी मिळून पाच विक्रेट्स घेतल्या. 33 षटकात भारत 4 बाद 153 धावांवर होता. 34.2 षटकात भारताची अवस्था सर्वबाद 153 धावा अशी झाली. आफ्रिकेने 11 चेंडूत भारताचे सहा फलंदाज शुन्य धावात गार केले.

भारत मोठी आघाडी घेणार असं वाटत असतानाच एन्गिडी अन् रबाडाने मनसुब्यांवर पाणी फेरले. त्यानंतर दुसऱ्या डावात सलामीवीर डीन एल्गर आणि एडिन माक्ररम यांनी 37 धावांची सलामी देत चांगली सुरूवात केली. यामुळे भारताने सामन्यावरची पकड गमावली असं वाटत होतं.

SA vs IND
Sa Vs Ind 2nd Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; भारताकडे 36 धावांची आघाडी

मात्र शार्दुल ठाकूरच्या जागी संघात आलेल्या मुकेश कुमारने पाठोपाठ दोन धक्के दिले. एल्गरला 12 आणि जॉर्जीला 1 धावेवर बाद केलं. त्यानंतर दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने टिस्ट्रन स्टब्सला 1 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. आफ्रिकेच्या पहिल्या दिवस अखेर दुसऱ्या डावात 3 बाद 36 धावा झाल्या.

कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट

  • 25 - AUS विरुद्ध ENG, मेलबर्न, 1902

  • 23 - SA विरुद्ध IND, केप टाउन, 2024

  • 22 - ENG विरूद्ध AUS, द ओव्हल, 1890

  • 22 - AUS विरुद्ध WI, अॅडलेड, 1951

  • 21 - SA विरुद्ध ENG, गकेबेर्हा, 1893

कसोटीत एकाच दिवशी सर्वाधिक विकेट्स

  • 27 - ENG वि AUS, लॉर्ड्स, 1888 (दिवस 2)

  • 25 - AUS विरुद्ध ENG, मेलबर्न, 1902 (दिवस 1)

  • 24 - ENG वि AUS, द ओव्हल, 1896 (दिवस 2)

  • 24 - IND वि AFG, बेंगळुरू, 2018 (दिवस 2)

  • 23 - SA वि AUS, केप टाउन, 2011 (दिवस 2)

  • 23 - SA वि IND, केप टाउन, 2024 (दिवस 1)

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.