मनमाड (जि. नाशिक) : हरियाणा येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय 'खेलो इंडिया' स्पर्धेत महाराष्ट्राच्या २० वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर याने वेटलिफ्टिंग प्रकारात ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील मुकुंदचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे छत्रे विद्यालयाचे क्रीडा तथा वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
गेल्या दोन वर्षांपूर्वी २०२० च्या जानेवारी महिन्यात आसामच्या गौहाटी येथे पार पडलेल्या 'खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मनमाडच्याच मुकुंद आहेर याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राच्या लौकिकात भर घातली होती. गेली दोन वर्षे या यशापासूनच प्रेरणा घेऊन यावर्षीही सलग मुकुंदची वेटलिफ्टिंग खेळातील तयारी सुरू होती. सध्या वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडच्या जय भवानी अद्यावत व्यायामशाळेत प्रशिक्षण घेत असलेल्या मुकुंदने हरियाणा राज्यातील पंचकुला येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय 'खेलो इंडिया २०२२' स्पर्धेत महाराष्ट्राच्या २० वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये ९९ किलो व क्लिन जर्क मध्ये १२१ किलो असे एकूण २२० किलो वजन उचलून टॉपचे स्थान पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मुकुंद या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा देशातील चमकदार खेळाडू ठरला आहे. मुकुंदने जिद्दीने आपल्या अधिकाधिक वजन उचलण्याचा सराव सुरू ठेवला होता. त्यात यश आल्यामुळेच हरियाणा येथे सुरू असलेल्या 'खेलो इंडिया २०२२ स्पर्धे' मध्ये सुवर्णपदकप्राप्तीचा पराक्रम करता आला.
मुकुंदचे याआधी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून पदार्पण
वयाच्या ५ व्या वर्षांपासून वेटलिफ्टिंगचा सराव करणाऱ्या मुकुंदने अगदी थोड्या कालावधीत आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून उदयास आला आहे. २०१८ मध्ये आसामच्या गौहाटी येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाले तसेच २०१९ मध्ये बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक तर २०२० च्या जानेवारी महिन्यात आसामच्या गौहाटी येथे झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीत राज्याचा नावलौकिक केला तसेच २०२० च्या फेब्रुवारी मध्ये उझबेकिंस्थान येथे झालेल्या एशियन युथ वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीत आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू म्हणून कार्य तसेच पतियाळा येथे ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक आणि सध्या हरियाणाच्या पंचकुला येथे सुरू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदक मिळवीत राज्याचे नाव राष्ट्रीय पदकवर कोरले.
स्वप्न साकार झाले ...
खेलो इंडिया स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते. ते साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे मुकुंदने सांगितले. माझे वडील संतोष आहेर कंत्राटी सुरक्षरक्षक म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करतात वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकलो. सुवर्णपदकामुळे मला शिष्यवृत्ती मिळाल्यास अजून जोमाने तयारी करून आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणार आहे त्यामुळे मला आधुनिक साहित्य व विशिष्ठ आहारासाठी ही शिष्यवृत्ती मिळणे आवश्यक असल्याचे मत मुकुंदने व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.