मुंबईचा मोहिते सलग 50 तास करतोय बॅटिंग; रडारवर आहेत 72 तास

Mumbai Batsmen Siddharth Mohite bated 50 hours
Mumbai Batsmen Siddharth Mohite bated 50 hours esakal
Updated on

मुंबई: मुंबईचा 19 वर्षाचा सिद्धार्थ मोहिते (Siddharth Mohite) गेल्या शुक्रवार रात्रीपासून नेटमध्ये बॅटिंग करतोय. त्याने आतापर्यंत 50 तास बॅटिंग केली आहे. त्याने पुण्याच्या विराग मरेचे (Virag Mare) सलग 50 तास 4 मिनिटे बॅटिंग करण्याचे रेकॉर्ड मोडले आहे. विराग मरेने 2015 ला सलग 50 तास 4 मिनिटे बॅटिंग केली होती. आता सिद्धार्थ मोहिते 72 बॅटिंग करून आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) कोरण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Mumbai Batsmen Siddharth Mohite bated 50 hours
ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला धमकी, 'पाकमधून जिवंत परत जाणार नाहीस'

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवरील (guinnessworldrecords.com) माहितीनुसार पुण्याच्या मरेने 50 तास 4 मिनिटे 51 सेकंद फलंदाजी केली करत वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. मरेने यावेळी गोलंदाज आणि बॉलिंग मशिन दोन्हीचा सामना केला होता. मात्र सिद्धार्थ मोहिते फक्त गोलंदाजांचा सामना करत आहे. सिद्धार्थ मोहितेला असे काही करायचे होते जे इतर कोणत्या क्रिकेटपटूंनी केलेले नाही. त्यावेळी त्याने आपले प्रशिक्षक ज्वाला सिंह यांच्याकडे नेटमध्ये सलग 72 तास फलंदाजी करण्याचा विचार बोलून दाखवला.

Mumbai Batsmen Siddharth Mohite bated 50 hours
विल यंगचा भन्नाट कॅच वर्षातील सर्वोत्तम? व्हिडिओ बघून तुम्हीच ठरवा

सुरूवातीला सिंह यांनी सिद्धार्थचे बोलणे फार गांभिर्याने घेतले नाही. मात्र आठवड्यानंतर मोहिते पुन्हा प्रशिक्षकांजवळ आला आणि पुन्हा एकदा विनंती केली. याबाबत सिंह म्हणाले, 'सिद्धार्थ एक दिवस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सर मला नेटमध्ये 52 तास सलग बॅटिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड तोडायचे आहे. मी हा प्रकार यापूर्वी कधी ऐकला नव्हता. सिद्धार्थ यासाठी माझ्या मागेच लागला. त्यानंतर मी त्याला माझ्या ठाण्यातील नेटमध्ये बॅटिंग करण्याची परवानगी दिली.'

FIFA ची आणखी एक किक; रशियाचे वर्ल्ड कप दरवाजे होणार बंद?

दरम्यान, सिद्धार्थ याबाबत त्याच्या भावंडांशी आणि मित्रांशी बोलला. त्याने या पराक्रमासाठी त्यांना मदतीचे आवाहन केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी काही प्रक्रिया करावी लागते. कोणतेही रेकॉर्ड करताना तटस्थ साक्षीदारांची गरज असते. सिद्धार्थ मोहितेचा भाऊ वैभव पवारने अशा तटस्थ साक्षीदारांची सोय केली. हा साक्षीदार सिद्धार्थच्या बॅटिंगवर तीन दिवस लक्ष ठेवणार आहे. हे साक्षीदार चार चार तासाच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. ते कितीवेळा मोहितेने ब्रेक घेतला आणि किती वेळाचा ब्रेक घेतला याची नोंद करत आहेत. एक माणूस सिद्धार्थच्या बॅटिंगचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे.

Mumbai Batsmen Siddharth Mohite bated 50 hours
विल यंगचा भन्नाट कॅच वर्षातील सर्वोत्तम? व्हिडिओ बघून तुम्हीच ठरवा

याचबरोबर सिद्धार्थ मोहितने पुण्यातील आपल्या मित्रांना बॉलिंग किट घेऊन ठाण्याला बोलवून घेतले आहे. दरम्यान, सिद्धार्थची आई सेजल आपल्या मुलाच्या या वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नाबाबत म्हणाली की, 'तो कोणते तरी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. तो यासाठी खूपच आग्रही आहे. तो नेमकं काय करणार आहे हे आम्हाला समजत नव्हते. मात्र त्याने एके दिवशी येऊन या रेकॉर्डबद्दल सांगितले. त्यावेळी आम्ही त्याला पाठिंबा दिला. लॉकडाऊनमुळे त्याला यासाठी तयारी करण्याचा वेळ मिळाला. एवढा वेळ बॅटिंग करणे सोपे नाही. त्याने यासाठी आपल्या मित्रासोबत सराव केला आहे. मला क्रिकेट फारसं कळत नाही मात्र मी माझ्या मुलाला पाठिंबा देत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.