Ind vs WI : 'गैर काय, सर्वच जण 'ते' कृत्य...' मुंबई क्रिकेट वर्तुळातून सर्फराझची पाठराखण

mumbai cricket-officials-came-to-support-of-sarfaraz-khan
mumbai cricket-officials-came-to-support-of-sarfaraz-khan
Updated on

Sarfaraz Khan Ind vs WI : रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही कसोटी संघासाठी सातत्याने विचार न होणारा मंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराझ खान चर्चेत आहे. तंदुरुस्तीबरोबर त्याची वर्तणूक चांगली नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुंबई क्रिकेटमधून मात्र त्याची पाठराखण केली जात आहे.

mumbai cricket-officials-came-to-support-of-sarfaraz-khan
ICC ODI World Cup Schedule: वनडे वर्ल्ड कपचे शेड्यूल आज होणार जाहीर! भारत-पाक सामन्यावर सर्वांचे लक्ष

वेस्ट इंडीज दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात सर्फराझ खानचा विचारही न झाल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सुरू झाली. रणजी क्रिकेटमधील कामगिरी लक्षात घेतली जात नसेल तर ही स्पर्धा घेताच कशाला, अशी जाहीर टीका सुनील गावसकर यांनी केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले.

कामगिरीमुळे नव्हे तर त्याची तंदुरुस्ती आणि वर्तणुकीमुळे सर्फराजचा विचार होत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध होऊ लागले, पण दोन्ही बाबतीत मुंबई क्रिकेट वर्तुळातून सर्फराझची पाठराखण करण्यात येत आहे. गेल्या रणजी हंगमात दिल्लीविरुद्ध शतक केल्यानंतर सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या दिशेने बोट दाखवून जल्लोष करण्याची कृती केली होती. त्या वेळी निवड समितीचा एक सदस्य तेथे उपस्थित होता.

mumbai cricket-officials-came-to-support-of-sarfaraz-khan
WC 2023 Qualifier : विंडीज संघाचा पाय आणखी खोलात! नेदरलँडकडून धक्कादायक हार

सर्फराझने शतक झळकावल्यानंतर प्रशिक्षक असलेल्या अमोल मुझुमदारच्या दिशेने अभिवादन केले होते आणि त्यांनीही टोपी काढून त्याचे अभिवादन स्वीकारले होते. निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष चेतन शर्मा त्या वेळी उपस्थित होते असे अगोदर सांगण्यात येत होते, परंतु चेतन शर्मा नसून निवड समितीचे सदस्य सलील अंकोला त्या वेळी हजर होते.

ड्रेसिंग रूमच्या दिशेने अभिवादन करण्यात गैर काय, सर्वच जण अशी कृती करत असतात, असे मुंबई क्रिकेटच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मोसमात मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्या वेळी मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित होते. सर्फराझच्या कृतीवरून ते नाराज झाले होते असे वृत्त होते, प्रत्यक्षात मात्र पंडित हे सर्फराझला मुलाप्रमाणे मानतात. तो १४ वर्षांचा असल्यामुळे पंडित त्याला ओळखतात. ते कधीच त्याच्यावर नाराज होणार नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.