'म्हणून लगेच विराट कोहली 'टीम इंडिया'साठी निरूपयोगी झाला का?'

Virat Kohli, Rohit Sharma
Virat Kohli, Rohit Sharma
Updated on

मुंबईकर माजी क्रिकेटपटूने केली विराटची पाठराखण

IND vs ENG 3rd Test: भारतीय संघ उद्यापासून इंग्लंडविरूद्ध (Ind vs Eng 3rd Test) तिसरी कसोटी खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघात (Team India) काही बदल केला जाणार की नाही याविषयी चर्चा सुरू आहेत. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या दोघांना संघात स्थान मिळेल का? किंवा जर या दोघांना स्थान मिळालं तर ते कोणाच्या जागी मिळेल? अशी चर्चा सध्या रंगलेली दिसत आहे. अशा वेळी काही दिवसांपासून लयीत नसणारा (Out of Form) विराट कोहली यानेही संघाबाहेर व्हावे असं मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं होतं. पण मुंबईचा (Mumbai) माजी खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarakar) याने या नेटकऱ्यांना झापलं असून विराटची (Virat Kohli) पाठराखण केली.

Virat Kohli, Rohit Sharma
IND vs ENG: बुमराहसोबतच्या राड्याबद्दल अखेर अँडरसनने सोडलं मौन

"विराटवर टीका करणाऱ्यांनी सध्या थोडा संयम पाळायला हवा आणि वाट पाहायला हवा. कारण केवळ दोन-तीन डावात धावा करता आल्या नाहीत म्हणून लगेच विराट कोहली हा 'टीम इंडिया'साठी निरूपयोगी झाला का?' विराटसारख्या मोठ्या खेळाडूला संघाबाहेर बसायला सांगणं योग्य आहे का? २०१८च्या दौऱ्यावर विराटने चांगल्या धावा केल्या होत्या. त्यावेळीही इंग्लंडकडे चांगले वेगवान गोलंदाज होते. पहिल्या डावात विराटला अंडरसने पहिल्या चेंडूवर बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला ४० धावा काढतानाही संघर्ष करावा लागला. आऊटस्विंग होणाऱ्या चेंडूवर फलंदाजाच्या बॅटची कट लागतेय, अशा पद्धतीच्या पिचवर सध्याचे सामने सुरू आहेत. अशा वेळी चौथ्या स्टंपवर केलेली गोलंदाजी हा कोणत्याही फलंदाजासाठी काहीसा चिंतेचाच विषय ठरू शकतो. पण विराटसारख्या खेळाडूबद्दल थोडं जपून मत मांडायला हवं", अशा शब्दांमध्ये आगरकरने विराटची पाठराखण केली.

Virat Kohli, Rohit Sharma
भारताला नेहमी नावं ठेवणाऱ्या क्रिकेटपटूने केलं विराटचं कौतुक

टीम इंडिया बलाढ्य आहे!

"तुमच्याकडे शिखर धवन आणि हार्दिक पांड्यासारखे अतिशय धडाकेबाज खेळाडू असतानाही तुम्ही त्यांना १५ जणांच्या संघात स्थान देत नाही. अशा प्रकारचे धाडस तोच संघ करू शकतो ज्या संघाकडे प्रतिभावान खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. अशा खेळाडूंना मागे ठेवून थेट इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघाशी खेळायला भारताचा संघ गेला यावरून कोणताही क्रिकेट चाहता याचा अंदाज बांधू शकतो की भारतीय संघ किती बलशाली आहे. आणि त्यावरून हेदेखील स्पष्ट होते की भारतीय क्रिकेटचा दर्जा किती उंचावला आहे", अशी भावना भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.