Jhulan Goswami : झुलन गोस्वामीची दुसरी इनिंग होणार सुरू; मुंबई इंडियन्सने दिली मोठी जबाबदारी

Jhulan Goswami
Jhulan Goswami sakal
Updated on

Jhulan Goswami : भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आता झुलन गोस्वामी आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहे. बीसीसीआयने नुकतेच महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) ची घोषणा केली. महिला क्रिकेट विश्वातील ही एक ऐतिहासिक घोषणा होती.

Jhulan Goswami
World Boxing Rankings : भारतीय बॉक्सर्सनी रँकिंगमध्ये रचला इतिहास, अमेरिकेला टाकले मागे

महिला प्रीमियर लीगमधील संघ आणि प्रासारक देखील निश्चित झाले आहेत. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये देखील संघ खरेदी केला आहे. आता याच संघाची गोलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर झुलन गोस्वामी असणार आहे. इंग्लंडची माजी कर्णधार चार्लेट एडवर्ड्सला मुंबई इंडियन्सने प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

मुंबई इंडियन्स महिला संघाची बॅटिंग कोच ही भारताची माजी अष्टपैलू खेळाडू देविका पल्शिकर असणार आहे. तर तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य संघाची व्यवस्थापन असणार आहे. झुलन गोस्वामीने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेतली. गोस्वामीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित 350 विकेट्स घेतल्या आहेत.

Jhulan Goswami
Pakistan Bomb Blast PSL : बॉम्ब ब्लास्ट झाला अन् बाबर आझम, शाहिद आफ्रिदीची झाली पळापळ

झुलन महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. याचबरोबर तिने महिला वनडे वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचाही विक्रम तिच्यात नावावर आहे. झुलन आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये देखील सामील आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.