जोस बटलरच्या जागी RR च्या संघात मिळालं स्थान
IPL 2021 in UAE: कोरोनाच्या (Coronavirus) फटक्यामुळे अर्ध्यातच थांबवलेली IPL स्पर्धा १९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बहुतांश खेळाडूंनी आपली उपलब्धता (Availability) कळवली आहे. पण काही खेळाडूंनी मात्र यातून वैयक्तिक (Personal Reasons) कारणास्तव माघार घेतली आहे. राजस्थानच्या संघातील जोस बटलर आणि बेन स्टोक्स या दोन इंग्लिश खेळाडूंनी स्पर्धेच्या उर्वरित टप्प्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या पर्यायी खेळाडू म्हणून राजस्थानने मुंबई इंडियन्सकडून खेळलेला धडाकेबाज फलंदाज एव्हिन लुईस आणि ओशेन थॉमस यांना संघात स्थान दिले आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या ट्वीटर (Twitter) हँडलवरून ही घोषणा केली आहे.
जोस बटलरच्या जागी सलामीवीर म्हणून एव्हिन लुईसला संघात स्थान मिळाले आहे. एव्हिन लुईसने २०१८मध्ये मुंबईच्या संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले. २०१८ आणि २०१९ या दोन हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळला. त्याने १६ सामन्यांमध्ये २७च्या सरासरीने ४३० धावा कुटल्या. २९ वर्षीय लुईसने विश्वविजेत्या वेस्ट इंडिजच्या संघात २०१६ला पदार्पण केले. त्याचवर्षी त्यांनी विश्वचषकही जिंकला. लुईसच्या नावे विंडिजचे प्रतिनिधित्व करताना ४५ टी२० सामन्यात १ हजार ३१८ धावा आहेत.
वेगवान गोलंदाज ओशेन थॉमस हा सध्या CPL मध्ये बार्बाडॉस रॉयल्स संघाकडून खेळत आहे. IPL 2019मध्ये ओशेनने राजस्थानच्या संघातूनच स्पर्धेतील आपल्या प्रवासाला सुरू केली होती. पण ४ सामन्यांनंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. २०१८मध्ये ओशेन थॉमसने विंडिजच्या संघात स्थान पटकावले. तेव्हापासून त्याने २० वन डे सामन्यात २७ गडी तर १७ टी२० सामन्यांमध्ये १९ बळी टिपले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.