Suryakumar Yadav : इम्पॅक्टच नाही! रोहितने 16 चेंडूत 15 धावा करणाऱ्या सूर्याला बसवले कट्ट्यावर

Suryakumar Yadav IPL 2023 RCB vs MI
Suryakumar Yadav IPL 2023 RCB vs MI esakal
Updated on

Suryakumar Yadav IPL 2023 RCB vs MI : आयपीएलचा हाय व्होल्टेज सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट केली होती. मात्र पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या 20 वर्षाच्या तिलक वर्माने 46 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी करत मुंबईला 171 धावांपर्यंत पोहचवले अन् लाज वाचवली. मात्र मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संधी मिळूनही काही करता आले नाही. तो 16 चेंडूत 15 धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला.

Suryakumar Yadav IPL 2023 RCB vs MI
RCB vs MI IPL 2023 : विराट वादळात मुंबईची उडाली दैना; RCB चा ग्रँड स्टाईलमध्ये विजय

सूर्यकुमार यादवच्या या खराब कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला. इनिंग संपल्यानंतर रोहितने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जेसन बेहरेन्डफोर्डला संधी दिली. रोहितने यावेळी सूर्यकुमार यादवला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवचा गोलंदाजीत उपयोग होणार नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी अतिरिक्त गोलंदाज म्हणून जेसनची संघात वर्णी लागली.

Suryakumar Yadav IPL 2023 RCB vs MI
Rohit Sharma : कार्तिक - सिराजची झाली टक्कर तरीही रोहितला उठवता आला नाही फायदा

मुंबईचे रथी महारथी ढेर होत असताना एकटा तिलक वर्मा एका बाजूने लढत होता. सुरूवातीला सावध पवित्र्यात असलेल्या तिलकने नंतर आपली धावगती वाढवली.

त्याला वधेराने 21 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई शंभरीच्या जवळ पोहचला. मात्र मोक्याच्या क्षणी वधेरा त्याने टीम डेव्हिडने तिलक वर्माची साथ सोडली. मात्र तिलक वर्माने आपला झुंजारपणा सोडला नाही.

तिलक वर्माने शेवटच्या दोन षटकात 38 धावा चोपून काढत मुंबईला 171 धावांपर्यंत पोहचवले. त्याला सिराजने एकाच षटकात 5 वाईड टाकून चांगली साथ दिली. तिलक वर्माने 46 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.