IND vs NZ: 'आग लगा देंगे' भारत-न्यूझीलंड सेमीफायनलदरम्यान वानखेडेवर घातपात? मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर धमकी

मुंबईत होणाऱ्या भारत न्यूझिलंड क्रिकेट सामन्यादरम्यान घातपात करण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे.
IND vs NZ
IND vs NZEsakal
Updated on

मुंबईत होणाऱ्या भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्यादरम्यान घातपात करण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सामन्यादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटरला टॅग करत, एका फोटोत गन, हॅड ग्रेनेड आणि काडतुस असलेले चित्र पोस्ट केले आहे. त्याचबरोबर भारत न्यूझीलंड सामन्या दरम्यान आग लगा देंगे अशा आशयाचे चित्र पोस्ट केले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

वानखेडेवर होणाऱ्या या सामन्यावेळी घातपाताची घटना घडणार असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केलं आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा मेसेज देणारा फोटोही धमकीच्या मेसेजसोबत पोस्ट करण्यात आला होता.

IND vs NZ
IND Vs NZ Semi Final : भारत-न्यूझीलंड सामन्यात पाऊस नाही तर... मैदानातील दव मोठी समस्या

मुंबईत होणाऱ्या या सामन्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने या सामन्याला मोठी गर्दी होणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांसह मुंबई पोलिस देखील सज्ज झाले आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांनी आवश्क ती काळजी घ्यावी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा असं आवाहन केलं आहे.

IND vs NZ
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून उपकर्णधार बाहेर, बुधवारी होणार संघाची घोषणा?

मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून सामन्यासाठीची तयारी करत आहेत. मुंबई पोलिसांतर्फे आव्हानसुद्धा करण्यात आलेलं आहे. नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. या परिसरात पार्किंगसाठी खूप कमी जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना चर्चगेट आणि मरीन लाईन्स या स्टेशनवरून स्टेडियमच्या गेटपर्यंत जाण्यासाठी फुटपाटमार्ग बॅरिकेट लावून व्यवस्था करण्यात आलेली आहे.

IND vs NZ
IND vs NZ Semi-Final : उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये होणार बदल? कोणत्या खेळाडूला मिळणार संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.