World Championship : मुरली श्रीशंकर लांब उडीच्या फायनलला जाणारा पहिला भारतीय खेळाडू

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Murali Sreeshankar first Indian qualify long jump
Murali Sreeshankar first Indian qualify long jump
Updated on

Murali Sreeshankar World Championships : मुरली श्रीशंकर जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या लांब उडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा मुरली श्रीशंकर पहिला भारतीय ठरला आहे. मुरली श्रीशंकर शिवाय अविनाश साबळेने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे. (Murali Sreeshankar becomes first ever Indian to qualify for men's long jump final at World Championships)

Murali Sreeshankar first Indian qualify long jump
बीडच्या अविनाश साबळेची World Championships मध्ये भरारी, अंतिम फेरीत मारणार बाजी?

मात्र मोहम्मद अनीस आणि जेसविन ऑल्ड्रिनने लांब उडीच्या अंतिम फेरीत स्थान गमावले. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 20 किमी शर्यतीच्या चालण्याच्या अंतिम फेरीत 34 वे स्थान पटकावले, तर संदीप कुमार पुरुषांच्या 40 व्या स्थानावर राहिला. श्रीशंकरने 8 मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. तर ऑल्ड्रिन 7.79 मीटर आणि अनीस 7.73 मीटरवर राहिले. मुरली श्रीशंकर व्यतिरिक्त, अविनाश आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा देखील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची सर्वात मोठी आशा आहे.

Murali Sreeshankar first Indian qualify long jump
झिम्बाब्वे T20 World Cup 2022 साठी पात्र, जाणून घ्या कोणते 16 संघ खेळणार

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजही यावेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात नीरजने स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम मोडला. यापूर्वी 14 जून रोजी नीरज चोप्राने तुर्कू येथील पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 फेक करून राष्ट्रीय विक्रम केला होता. तेथे त्याला रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. आता पुन्हा एकदा सर्वांच्या आशा नीरजवर टेकल्या असून 19 वर्षांचा हा दुष्काळ यंदा संपुष्टात येईल, असे मानले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()