Mushfiqur Rahim gets out Handling the Ball : नुकत्याच झालेल्या 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूजचा टाईम आऊट चर्चेत राहिला होता. ज्या संघाविरुद्ध मॅथ्यूज टाईम आऊट झाला होता तो बांगलादेश होता. आता बांगलादेशी संघाचा खेळाडू ही अशाच विचित्र पद्धतीने आऊट झाला.
खरंतर, ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम 'बॉल हाताळणे' याचा बळी ठरला. यासोबतच कसोटी फॉरमॅटमध्ये या नियमानुसार बाद होणारा तो जगातील 8वा फलंदाज ठरला आहे.
ढाका येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशच्या डावाच्या 41व्या षटकात 35 धावा काढून रहीम अनोख्या पद्धतीने बाद झाला. काइल जेमिसनच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने बचावात्मक शॉट खेळला आणि चेंडूला हाताने ढकलले.
यानंतर, किवी संघाने त्याला आऊट करण्याची अपील केले. मैदानी पंचांनी आपापसात यावर चर्चा केली आणि नंतर ते तिसऱ्या पंचाकडे गेले. थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यानंतर रहीमला 'बॉल हाताळल्याबद्दल' आउट घोषित केले. अशाप्रकारे 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड'चा बळी ठरणारा मुशफिकुर रहीम बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला.
अशाप्रकारे बाद होणाऱ्या निवडक फलंदाजांच्या यादीत तो सामील झाला. त्यात मोहिंदर अमरनाथ, मोहसीन खान, मायकल वॉन या खेळाडूंचा समावेश आहे.
नियम काय सांगतात?
नियम 37.1.1 : जर एखादा फलंदाज, चेंडू खेळल्यानंतर, हेतूपूर्वक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या सहमतीशिवाय चेंडू हाताळला किंवा त्याच्या बोलण्याने किंवा कृतीने लक्ष विचलित केले तर त्या त्या फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.