बेळगाव :
Muttiah Muralitharan Investment : श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय माजी फिरकीपटू मुथैय्या मुरलीधरन उद्योगासाठी धारवाड (Dharwad) जिल्ह्यामध्ये दाखल झाला आहे. मुम्मट्टी येथील औद्योगिक वसाहतीत एनर्जी ड्रिंकसाठी आवश्यक अल्युमिनियमचे कॅन बनविण्याचा कारखाना स्थापन केला जाणार आहे. या उद्योगासाठी तब्बल १०० कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.
माजी क्रिकेटपटू मुरलीधरनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उद्योजक व्हावे, या विचारातून श्रीलंकेत व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये तो यशस्वीही झाला. श्रीलंकेत त्याने 'सिलोन बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' ही थंडपेय तयार कंपनी स्थापन केली. आता मुरलीमरने या कंपनीचा विस्तार भारतातही करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (Muttiah Muralitharan Investment Business In India)
हा प्रकल्प धारवाड तालुक्याच्या मुम्मीगट्टी या गावात सुरू करण्याच येणार आहे. यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली आहे.
थंड पेयाबरोबर अॅल्युमिनियम कॅन बनविण्याच्या व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात २५६ कोटी गुंतवणूक करण्यात येणार आहे. विविध आकारातील ७ अॅल्युमिनियम तयार होणार असून, या कंपनी पहिल्या टप्प्यात २०० रोजगारही मिळणार आहे. तसेच कंपनीचा टप्प्याटप्प्याने विस्तार देखील करण्याचा निर्धारही मुरलीधरनने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.