नागपूरच्या मालविका बनसोडची China open 2024 स्पर्धेतील स्वप्नवत वाटचाल संपुष्टात

China Open 2024 : मालविकाने जपानच्या अकाने यामागुचीला १५-१५ असे रोखले होते, पण या निर्णायक क्षणी यामागुचीने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली.
Malvika Bansod
Malvika Bansodesakal
Updated on

Malvika Bansod loses in China Open 2024: ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीला धक्का देत आगेकूच करणाऱ्या भारताच्या मालविका बनसोड हिची चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील स्वप्नवत वाटचाल उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली. मालविकाचा जपानच्या अकाने यामागुचीकडून १०-२१, १६-२१ असा पराभव झाला. यामागुची मालविकापेक्षा अनुभवात मोठी आहे. पी. व्ही. सिंधूलाही गेल्या काही सामन्यांत यामागुचीला पराभूत करता आलेले नाही.

यामागुची जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. मालविकाविरुद्धच्या हा सामना तिने ३५ मिनिटांत जिंकला. यामागुचीविरुद्ध मालविकाचा हा सलग तिसरा पराभव आहे. मालविका यामागुचीसमोर आव्हान उभे करू शकली नाही, पहिल्या गेममध्ये ती ४-१२ असे पिछाडीवर पडली होती. त्यानंतर हा गेम यामागुचीने २१-१० असा एकतर्फी जिंकला.

Malvika Bansod
भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई; जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही

दुसऱ्या गेमममध्ये मात्र कमालीची चुरस झाली. मालविकाने यामागुचीला १५-१५ असे रोखले होते, पण या निर्णायक क्षणी यामागुचीने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली.

मालविका जागतिक क्रमवारीत ४३ व्या स्थानावर आहे. पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांच्यानंतर सुपर १००० श्रेणीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली होती. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत क्रिस्ची ग्लिमोवर २१-१७, १९-२१, २१-१६ अशी मात केली होती. त्याअगोदर पॅरिस ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेक्या इंडोनेशियाच्या ग्रेगरिया मारिस्का हिला पराभवाचा धक्का दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.