Nagpur Sport : रितिक, तेजस्विनी अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेते

एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या गौरव खोडतकरने चौथे आणि ए. डी. कॉलेजच्या सनी फुसाटेने पाचवे स्थान मिळविले.
sport
sportsakal
Updated on

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत रितिक पंचबुद्धेने पुरुष गटात, तर तेजस्विनी लामकाणेने महिला गटात सुवर्णपदक पटकाविले.

विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील क्रीडा संकुलापासून आरंभ झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या २१ किमी धावण्याच्या स्पर्धेत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या रितिकने १ तास ११.५६ सेकंद वेळेची नोंद करीत अव्वल स्थान प्राप्त केले. भारसिंगी येथील ए. डी. कॉलेजच्या विकास बिसनेने १ तास १२.३९ सेकंदाची वेळ नोंदवित दुसरे व त्याचाच सहकारी सागर सिंधापूरेने १ तास १३.४६ एवढी वेळ नोंदवित तिसरे स्थान मिळविले.

एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या गौरव खोडतकरने चौथे आणि ए. डी. कॉलेजच्या सनी फुसाटेने पाचवे स्थान मिळविले. महिला गटात पीजीटीडीच्या तेजस्विनीने १ तास २३.४४ सेकंदाची वेळ नोंदवित सुवर्णपदकावर नाव कोरले.

sport
Sport News : भारताच्या खो-खो संघात महाराष्ट्राचे चौघे

एलपीसी मांढळच्या पुजा पंचबुद्धेने १ तास ३१.२९ अशी वेळ नोंदवित दुसरे व एस. बी. सिटीच्या प्रांजली मालखेडेने तिसरे स्थान पटकावले. तिने १ तास ३८.११ सेकंद इतकी वेळ नोंदविली. याशिवाय ए. डी. कॉलेजच्या निधी तरारेने (१ तास ३९.५३ सेकंद) चौथे स्थान मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.