IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यात शेवटच्या क्षणी बदलला कर्णधार, 'या' खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा

IND vs BAN
IND vs BAN esakal
Updated on

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होत असलेलेल्या वनडे वर्ल्डकप सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र बांगलादेशला नाणेफेकीपूर्वीच मोठा धक्का बसला. त्यांचा कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीमुळे आजचा भारताविरूद्धचा सामना खेळू शकणार नाहीये. शाकिबच्या ऐवजी बांगलादेशचे नेतृत्व नजमुल होसैन शान्तो करणार आहे.

IND vs BAN
IND Vs BAN World Cup : विराटचे वर्ल्डकपमधील पहिले शतक; भारताचा विजयी चौकार

नाणेफेकीवेळी शान्तो म्हणाला की, 'बांगलादेशचे नेतृत्व करायला मिळणे ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शाकिबला दुखापत झाली आहे. त्यातून तो अजून सावरलेला नाही. त्याच्या ऐवजी नसुम संघात आला आहे.

आम्ही आज प्रथम फलंदाजी करणार आहोत. भारताविरूद्ध आमच्या काही खास आठवणी आहेत. आम्हाला आशा आहे की आम्ही आमचा फॉर्म कायम ठेवू. मला आशा आहे की हा एक चांगला सामना होईल. आम्हाला चाहत्यांचा पाठिंबा आवडतो. आशा आहे की ते दोन्ही संघांना पाठिंबा देतील.'

IND vs BAN
Virat Kohli : बांगलादेशची आक्रमक सुरूवात... हार्दिकनं सोडलं मैदान अन् विराटने तब्बल 6 वर्षांनी वनडेत केली गोलंदाजी

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणाऱ्या बांगलादेशने दमदार सुरूवात केली. लिटन दास आणि तन्जिद हसन यांनी 15 षटकात 93 धावांची सलामी दिली. तन्जिद हसनने 43 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने अर्धशतकवीर तन्जिदला बाद करत बांगलादेशला मोठा धक्का दिला.

यानंतर लिटन दासने शान्तोसोबत बांगलादेशला शतक पार करून दिले. मात्र रविंद्र जडेजाने शान्तोला 8 धावांवर पायचीत बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.