आयसीसी महिला वर्ल्डकप (ICC Women's World Cup) स्पर्धेत इंग्लंडने भारताचा (England Women) चार विकेट्सनी पराभव करत तीन सामन्यानंतर आपले विजयाचे खाते उघडले. भारताने (India Women) ठेवलेले 135 धावांचे आव्हान इंग्लंडने 31.2 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारतीय गोलंदाजांनी देखील माफक आव्हानातही इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. मात्र कर्णधार हेथर नाईटने नाबाद 53 तर नताली सिव्हरने (Natalie Sciver) 45 धावांची खेळी करून इंग्लंडला तारले. इंग्लंडला हा विजय साकारण्यासाठी नशिबाची साथही लाभली होती. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भारताची अव्वल वेगावान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) सामन्याचे पाचवे षटक टाकत होती. त्यावेळी स्ट्राईकवर सिव्हर होती. इंग्लंडने आधीच दोन फलंदाज स्वस्तात गमावले होते. त्यात झुलनसा पाचव्या षटकाचा चौथा चेंडू इन स्विंग झाला आणि सिव्हरच्या बॅट पॅड गॅपमधून स्टंपच्या दिशाने गेला. यावेळी बॉल सिव्हरच्या बॅटची कडा घेऊन गेला होता. त्यामुळे चेंडूचा वेग मंदावला आणि तो स्टंपवर जाऊन आदळला. मात्र कमी वेगामुळे स्टंपवरील बेल्स (Stump Bails) पडल्याच नाहीत. सिव्हर थोडक्यात बचावली.
यानंतर सिव्हर आणि कर्णधार नाईटने तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचून भारताचा कडवा प्रतिकार मोडून काढला. या दोघांच्या या भागीदारीमुळेच इंग्लंडने भारताचे 135 धावांचे आव्हान 31.2 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार हेथर नाईटने नाबाद 53 धावांची भागीदारी रचली. भारताकडून मेघना सिंहने भेदक मारा करत 26 धावात 3 बळी टिपले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.