National Sports Competition : महाराष्ट्राचे आता ‘मिशन उत्तराखंड’

गोव्यात सध्या सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतक्त्यात अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्राने द्विशतकी पदकांच्या दिशेने कूच केली आहे.
namdev shirgavkar
namdev shirgavkarsakal
Updated on

पणजी - गोव्यात सध्या सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतक्त्यात अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्राने द्विशतकी पदकांच्या दिशेने कूच केली आहे. या कामगिरीने प्रेरित होऊन महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आतापासूनच पुढील स्पर्धेसाठी ‘मिशन उत्तराखंड’ मोहीम हाती घेतली असून त्या दृष्टीने आराखडा तयार होत आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

गोव्यातील स्पर्धेत महाराष्ट्राने सेनादलास मागे टाकून अव्वल क्रमांक मिळविला आहे. त्यांनी १८० पेक्षा जास्त पदकांची कमाई केली असून लवकरच द्विशतक पार होण्याचे संकेत आहेत. गोव्यानंतर पुढील वर्षी उत्तराखंड राज्यात ३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नियोजित आहे. त्या स्पर्धेतही सर्वाधिक पदकांसाठी महाराष्ट्र दावेदार राहील, असा विश्वास शिरगावकर यांनी व्यक्त केला.

‘पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये होत आहे. पदकप्राप्तीसाठीचा साठ टक्के आराखडा तयार आहे. केवळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर ऑलिंपिक स्पर्धांतही महाराष्ट्राच्या खेळाडूंना जास्त पदके मिळावीत, यासाठी आम्ही नियोजन करत आहोत,’ असे शिरगावकर म्हणाले.

महाराष्ट्राला आतापर्यंत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतक्त्यात एवढी मोठी मजल मारता आली नव्हती. योग्य खेळाडूंची निवड, त्यांना उपयुक्त मार्गदर्शन, सुविधा आणि सवलती पुरविण्याचे धोरण राबविण्यात आले. त्यामुळे आम्हाला गोव्यात विक्रमी यश लाभले आहे.

- नामदेव शिरगावकर, सचिव महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.