Naymar :क्रोएशियाविरूद्ध अखेरच्या क्षणी गोल करत नेमारने पेलेंशी केली बरोबरी

Naymar Equals Pele Record
Naymar Equals Pele Recordesakal
Updated on

Naymar Equals Pele Record : फिफा वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलच्या स्टार स्ट्रायकर नेमारने क्रोएशियाविरूद्ध गोल करत दिग्गज पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. नेमारने क्रोएशियाविरूद्ध एक्स्ट्रा टाईममध्ये 15 व्या मिनिटाला गोल केला. या गोलबरोबरच नेमारने ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 77 गोल करण्याच्या पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

Naymar Equals Pele Record
Cristiano Ronaldo : बेंचवर बसवलेल्या रोनाल्डोने सराव सत्राला मारली दांडी; क्वार्टर फायनलमध्ये नाट्य घडणार?

फिफा वर्ल्डकपच्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पहिल्या मिनिटापासून आक्रमक चाली रचणाऱ्या ब्राझीलने 90 मिनिटात क्रोएशियावर तब्बल 18 वेळा चढाई केली. त्यातील 8 शॉट्स गोलपोस्टचा अचूक वेध घेणारे होते. मात्र बॉल आणि गोलपोस्टच्या मधी लिव्हाकोव्हिक उभा होता. मात्र सामना एक्स्ट्रा टाईममध्ये नेत प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यात तरबेज असलेल्या क्रोएशियाने हा सामना देखील एक्स्ट्रा टाईममध्ये नेला.

Naymar Equals Pele Record
FIFA World Cup : नेमारला डेट करणारी मॉडेल कॅरोलिन झाली त्याच्या मित्राच्या बाळाची आई

एक्स्ट्रा टाईममध्ये देखील ब्राझीलने दमदार सुरूवात करत क्रोएशियाच्या बचाव फळीला आणि गोलकिपरला चांगलेच कामाला लावले. मात्र जसजसा सामना पुढे सरकत गेला क्रोएशियाने आक्रमक चढाया करत ब्राझीलला टेन्शन देण्यास सुरूवात केली होती. मात्र नेमारने एक्स्ट्रा टाईमचा पहिला हाफ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना क्रोएशियाची गोलपोस्ट भेदली. त्याने लिव्हाकोव्हिकला चकावा देत ब्राझीलचा पहिला गोल डागला. यानंतर ब्राझीलला सेमी फायनल गाठण्यासाठी फक्त पुढची 15 मिनिटे क्रोएशियाचे आक्रमण रोखून धरायचे होते.

मात्र क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोव्हिकने 117 व्या मिनिटाला ब्राझीलवर गोल करत सामना बरोबरीत आणला. जपान प्रमाणे हा सामना देखील क्रोएशियाने पेनाल्टी शूटआऊटवर नेला.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.