Neeraj Chopra : डायमंड लीगमध्ये न खेळण्यामागे नीरज चोप्राची मोठी खेळी! सांगितला काय आहे प्लॅन

भारताचा महान ॲथलीट नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली अशा प्रकारचे वृत्त समोर आले होते...
Neeraj Chopra Paris Olympics
Neeraj Chopra Paris Olympics sakal
Updated on

भारताचा महान ॲथलीट नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली अशा प्रकारचे वृत्त समोर आले होते, पण स्वत: नीरज याने बुधवारी समाजमाध्यमावर याबाबत माहिती देताना म्हटले की, पॅरिस डायमंड लीग ही स्पर्धा माझ्या कॅलेंडरमध्ये समाविष्ट नव्हती.

त्या स्पर्धेत सहभागाची नोंदच केली नसल्यामुळे यामधून माघार घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. डायमंड लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय आधीच घेतला होता. सध्या माझे पॅरिस ऑलिंपिकमध्ये धडाकेबाज कामगिरी करण्याचे लक्ष आहे.

Neeraj Chopra Paris Olympics
Champions Trophy 2025 : 9 महिन्यांनंतर IND vs PAK पुन्हा भिडणार लाहोरमध्ये! BCCIच्या 'त्या' निर्णयाची प्रतीक्षा

भारतीय ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला याप्रसंगी म्हणाले, राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेमध्ये भारतातील प्रत्येक खेळाडूचा सहभाग अनिवार्य होता. आंतरराज्य व पॅरिस डायमंड लीग या दोन्ही स्पर्धा एकाच कालावधीत होत असल्यामुळे फक्त नीरजला सूट देण्यात आली होती.

नीरज चोप्रा मात्र मागील महिन्यात म्हणाला होता की, पॅरिस डायमंड लीग ही स्पर्धा ऑलिंपिक व आंतरराज्य या दोन स्पर्धांमध्ये होती. मी दोहा येथे स्पर्धा खेळत असल्यामुळे भारतातील आंतरराज्य स्पर्धेत मी सहभागी व्हायला हवे, असे ठरवण्यात आले. त्यामुळे मी भारतातील स्पर्धेमध्ये खेळलो. त्यानंतर माझ्या तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे लागले. अन्यथा तुर्की येथील स्पर्धेनंतर थेट पॅरिस ऑलिंपिककडे रवाना झालो असतो.

Neeraj Chopra Paris Olympics
Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी; Video

सलग दुसऱ्या ऑलिंपिक पदकासाठी सज्ज

इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌सचे (आयआयएस) प्रमुख स्पेन्सर मॅके यांनी नीरज चोप्राच्या तंदुरुस्तीचे कौतुक केले. ते म्हणाले, नीरज चोप्राने दुखापतींना मागे टाकले आहे. त्याची शारीरिक रचना उत्तम आहे. जेव्हा ऑलिंपिक सुरू होईल तेव्हा तो देशाला सलग दुसरे पदक मिळवून देण्यासाठी सज्ज असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.