Neeraj Chopra Won Gold Medal : जवळपास एका महिन्याच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये 87.66 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावले. नीरजने पाचव्या प्रयत्नात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. दुखापतीनंतर जवळपास एका महिन्याने पुनरागमन करणाऱ्या नीरजची स्पर्धेची सुरूवात फार चांगली झाली नव्हती.
त्याचा पहिला प्रयत्न हा फाऊल ठरला होता. मात्र त्यानंतर नीरजने जोरदार पुनरागमन करत जर्मनीच्या ज्युलियन वीबर आणि चेक प्रजास्ताकच्या याकूब वादलेज्चेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.
नीरज चोप्राचे हे आठवे आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आहे. यापूर्वी त्याने एशियन गेम्स, साऊथ एशियन गेम्स, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या वर्षी त्याने दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले आहे. यापूर्वी नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
त्यानंतर त्याचा स्नायू दुखावल्यामुळे त्याने काही स्पर्धांमधून माघार घेतली होती. त्यानंतर लुसाने डायमंड लीगमध्ये त्याने पुनरागमन केले. त्याचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 83.52 मीटर भाला फेकून दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 85.04 मीटर भालाफेक केली. मात्र 86.20 मीटर भाला फेकणारा ज्युलियन वीबर आघाडीवर होता.
नीरजने चौथ्या प्रयत्नात पुन्हा एकदा फाऊल केला. त्यामुळे त्याच्यावर पाचव्या फेकीवेळी दबाव होता. मात्र त्याने हा दबाव झुगारून देत 87.66 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकावर दावा ठोकला.
नीरजचे आव्हान परतवून लावण्यासाठी वीबरने आपला शेवटचा भाला फेकला. हा भाला 87.03 मीटर पर्यंत पोहचला. यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर लांब भाला फेकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.