Neeraj Chopra राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भावूक, चाहत्यांना म्हणाला...

नीरजने ट्विटरवर चाहत्यांसाठी भावूक पोस्ट शेअर केली
Neeraj Chopra
Neeraj Chopra esakal
Updated on

Neeraj Chopra Emotional Message : ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा हा बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी दिली. नीरज चोप्राने त्याच्या दुखापतीबाबत माहिती देत तो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकत नसल्याचे सांगितले. आता त्यांनी स्वतःही याबाबत माहिती दिली आहे. नीरजने ट्विटरवर चाहत्यांसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

नीरजने पोस्टमध्ये लिहिले की, मला तुम्हा सर्वांना सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, यावेळी मी राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या चौथ्या थ्रो दरम्यान मला किरकोळ दुखापत झाली आहे. ज्यासाठी यूएसएने मला काही आठवड्यांसाठी काही आठवड्यांसाठी पुनर्वसनाचा सल्ला देण्यात आला आहे. मला खंत आहे की मी बर्मिंगहॅम मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष माझ्या पुनर्वसनावर असेल. ज्यासोबत मी लवकरच मैदानात येण्याचा प्रयत्न करेन. मला देशवासीयांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.