Neeraj Chopra
Neeraj Choprasakal

Neeraj Chopra : नीरज चोप्राला आज सुवर्णपदकाची अपेक्षा

लुसान डायमंड लीगमध्ये सहभाग
Published on

लुसान : दुखापतीतून सावरल्यानंतर नीरज चोप्रा उद्या, शुक्रवारी होणाऱ्या लुसान डायमंड लीगमध्ये सहभागी होत आहे. एक महिन्याच्या कालावधीनंतर स्पर्धेत सहभागी होत असलेल्या नीरजला अव्वल स्थानाची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला लांब उडीचा खेळाडू मुरली श्रीशंकरसुद्धा सहभागी होत आहे.

Neeraj Chopra
Mumbai : मुंबईत पुन्हा धावत्या लोकलमध्ये विनयभंग; महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

२५ वर्षीय नीरजने मे महिन्यात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत ८८.६७ मीटर कामगिरीसह अव्वल स्थान मिळवताना मोसमाची झकास सुरुवात केली होती; मात्र त्यानंतर सराव करताना त्याचा स्नायू दुखावला होता.

दुखापत आणखी चिघळू नये यासाठी त्याने ४ जून रोजी झालेल्या नेदरलँडमधील हेंगलो येथे झालेल्या फॅनी ब्लँकर्स कोएन आणि १३ जून रोजी फिनलंडमधील टुर्कू येथे झालेल्या स्पर्धेतून माघार घेतली होती. पण दोहानंतर रबात, रोम, पॅरिस व ओस्लो येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये भालाफेक इव्हेंट नसल्याने नीरजचे फारसे नुकसान झाले नाही.

Neeraj Chopra
Mumbai : आयपीएल पोलीस बंदोबस्ताला बंपर सुट! 70 लाखांऐवजी फक्त 10 लाख शुल्क

लुसान येथील स्पर्धेत नीरजला दोहाप्रमाणेच प्रतिस्पर्ध्यांचे तगडे आव्हान राहणार आहे. त्यात टोकियो ऑलिंपिकचा रौप्यपदक विजेता व यंदाच्या मोसमात ८९.५१ मीटरसह आघाडीवर असलेला झेकचा याकूब वाल्डेज, विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स, फिनलंडचा ऑलिव्हर हेलँडर, २०१२ चा ऑलिंपिक विजेता केशॉर्न वॉलकॉट आणि जर्मनीचा ज्युलियन वेबेर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दोहा येथे अव्वल स्थान मिळवल्याने नीरज आठ गुणांसह आघाडीवर असून वाल्डेज सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी डायमंड लीग विजेतेपद मिळवणाऱ्या नीरजचे लक्ष्य यंदाही विजेतेपदाच्या करंडकावर आहे. यानंतर मोनॅको येथे २१ जुलै आणि झ्युरीच येथे ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेत भालाफेक इव्हेंट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()