Neeraj Chopra च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; Diamond League 2024 च्या दृष्टीने आहे अत्यंत महत्त्वाची

Diamond League 2024 Final : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदकानंतर नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये खेळला होता, परंतु दुखापतीमुळे त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
Neeraj Chopra
Neeraj Chopra esakal
Updated on

Neeraj Chopra in Diamond League 2024 Final : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा डायमंड लीगच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. १५ गुणांसह त्याने अव्वल सहा जणांमधील आपले स्थान कायम राखले आहे आणि आता तो १३ व १४ सप्टेंबरला होणाऱ्या डायमंड लीग फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे.

जगातील अव्वल सहा भालाफेकपटू डायमंड लीग २०२४ च्या फायनलसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबर, याकूब व्हॅडलेज्च, नीरज चोप्रा, अॅड्रीयन मार्डेर व रॉडरिच जेन्की डीन यांचा समावेश आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra esakal

लोझान डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानासह नीरजने खात्यात ७ गुणांची भर टाकली होती. त्यामुळे त्याची एकूण गुणसंख्या १५ झाली आणि तो वेबरच्या बरोबरीत आला. पीटर्स २१ गुणांसह आघाडीवर आहे. झेक प्रजासत्ताकच्या याकुब १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. काल पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याने ८२.०३ मीटर लांब भाला फेकला होता. २६ वर्षीय नीरजने ८९.४९ मीटर लांब भालाफेक केली होती आणि ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने पॅरिसमद्ये ८९.४५ मीटर लांब भालाफेकला होता.

Diamond League History...

२०१० पासून डायमंड लीगला सुरुवात झाली आणि मैदानी खेळातील ( Track and Field) खेळाडूंसाठी ही वार्षिक लीग असते. यात जगातील सर्वोत्तम १५ खेळाडू सहभाग घेत असतात... २०१९ मध्ये यात काही बदल केले गेले. डायमंड लीगमध्ये एकूण १५ मीट म्हणजेच १५ स्पर्धा होतात आणि त्यानंतर विजेता ठरवला जातो. २० एप्रिल ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत डायमंड लीगच्या १५ स्पर्धा होणार आहेत.


गुण कसे दिले जातात?

  • पहिला क्रमांक - ८ गुण

  • दुसरा क्रमांक - ७ गुण

  • तिसरा क्रमांक - ६ गुण

  • चौथा क्रमांक - ५ गुण

  • पाचवा क्रमांक - ४ गुण

  • सहावा क्रमांक - ३ गुण

  • सातवा क्रमांक - २ गुण

  • आठवा क्रमांक - १ गुण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.