World Athletics Championships स्पर्धेसाठी ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा सज्ज

World Athletics Championships 2025: जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवत भालाफेकपटू नीरज चोप्रा तयारीला लागला आहे.
neeraj chopra
neeraj chopra esakal
Updated on

Neeraj chopra: सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने आता पुढील वर्षी (२०२५) होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. हरियानातील क्रीडा विद्यापीठात आयोजित ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ कार्यक्रमात भालाफेकपटू नीरज चोप्रा बोलत होता.

नीरज चोप्रा याप्रसंगी म्हणाला, "हा मोसम नुकताच पार पडला असून आता मी पुढल्या मोसमासाठी सज्ज होत आहे. जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ठसा उमटवायचा आहे. ऑलिम्पिकही दृष्टिपथात आहे, मात्र ऑलिम्पिकला अद्याप चार वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे सध्या ऑलिम्पिकचा विचार करीत नाही."

neeraj chopra
बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची लढत भारतीयांमध्येच व्हावी; वाचा काय म्हणाले विश्वनाथन आनंद

नीरज चोप्राला मागील मोसमात दुखापतीमुळे काही स्पर्धामधून माघार घ्यावी लागली. यावेळी त्याला तंदुरुस्तीबाबत विचारले. तो म्हणाला, "मागील वर्षभर दुखापतीने घेरले होते, पण आता १०० टक्के तंदुरुस्त आहे. काही तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करावयाच्या आहेत. आगामी काळात याकडे लक्ष देईन. आता भारतामध्ये सराव करणार आहे, पण स्पर्धांचा मोसम सुरू झाल्यानंतर परदेशात सरावासाठी जाईन."

नीरज चोप्राला अद्याप ९० मीटरचा टप्पा ओलांडता आलेला नाही. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर भाला फेकला. त्याला रौप्यपदक प्राप्त झाले. त्यानंतर नीरजने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत ८७.८६ मीटर भाला फेकून रौप्यपदक जिंकले. येथेही त्याला ९० मीटर भाला फेकता आला नाही.

neeraj chopra
Accident Updates : Musheer Khan च्या गाडीचा भीषण अपघात, मेडिकल रिपोर्ट समोर; पाहा धडकी भरवणारे Photos

आगामी स्पर्धांमध्ये ठसा उमटवणार

भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांवरच समाधान मानावे लागले. याबाबत नीरज चोप्रा म्हणाला, "पॅरिसमध्ये भारताला अधिक पदके मिळाली नाहीत, पण भारताचे बहुतांशी खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले आहेत. त्यामुळे या खेळाडूंचे पदक थोडक्यात हुकले. पॅरालिम्पिकमध्ये मात्र भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. आगामी ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक या दोन्ही क्रीडा महोत्सवांत भारतीय खेळाडू ठसा उमटवतील, असा विश्‍वास त्याने पुढे व्यक्त केला."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.