Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

Paris Olympics Neeraj Chopra Injured : यावेळी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची सर्वात मोठी आशा आहे.
Neeraj Chopra Injured Paris Olympics
Neeraj Chopra Injured Paris Olympics
Updated on

Paris Olympics Neeraj Chopra Injured : यावेळी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची सर्वात मोठी आशा आहे. पण ऑलिम्पिकच्या दोन महिन्यांपूर्वी नीरज दुखापतग्रस्त झाल्याने पदकाच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. या कारणास्तव त्याने 63 व्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2024 ऍथलेटिक्स मीटमध्ये भाग घेतला नाही.

Neeraj Chopra Injured Paris Olympics
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2024 मध्ये सहभागी होणार नाही. याला दुजोरा देत आयोजकांनी सांगितले की, दुखापतीमुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. मात्र, ते या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दोन आठवड्यांपूर्वीच ओडिशा येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये नीरज सहभागी झाला होता. आता फेडरेशन कपदरम्यान नीरजला दुखापत झाली होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तीन वर्षांनंतर प्रथमच भारतात स्पर्धा खेळत नीरजने बुधवारी येथे फेडरेशन चषक स्पर्धेत 82.27 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. मात्र, त्याचे शेवटचे दोन थ्रो घेतले नाहीत.

Neeraj Chopra Injured Paris Olympics
Hardik Pandya : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पांड्या कुठे झाला गायब? टी-20 वर्ल्ड कपसाठी गेला नाही संघासोबत

चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सर्वोत्तम पदकाच्या आशेपैकी एक आहे, जिथे तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले सुवर्णपदक कायम ठेवण्यास उत्सुक असेल. आयोजकांनी सांगितले की त्यांना चोप्रा यांनी ही माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी या स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगितले. त्याच्या जागी युरोपियन चॅम्पियन जर्मनीचा ज्युलियन वेबर या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.