Neeraj Chopra: मायदेशातील स्पर्धेतही नीरजचा डंका! तीन वर्षांनी पुनरागमन करत फेडरेशन कपमध्ये जिंकले सुवर्णपदक

Neeraj Chopra: नीरज चोप्राने भुवनेश्वरला होत असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 Neeraj Chopra
Neeraj ChopraSakal
Updated on

Federation Cup men's Javelin Throw final: भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर फेडरेशन करंडक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पुरुषांची भालाफेक स्पर्धा बुधवारी (१५ मे) पार पडली. या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिला क्रमांक मिळवला आहे. नीरज या स्पर्धेत तीन वर्षांनंतर सहभागी झाला.

या स्पर्धेत नीरज त्याच्या सर्वोत्तम लयीत दिसत नव्हता. पाच दिवसांपूर्वीच डायमंड लीग खेळून आल्यानंतर तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. पण असे असले तरी त्याने बुधवारी सर्वोत्तम ८२.२७ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर हक्क सांगितला.

दरम्यान, या स्पर्धेत ८२ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले, तर उत्तम पाटीलने कांस्य पदक मिळवले. त्याने ७८.३९ मीटर लांब भाला फेकला.

 Neeraj Chopra
Federation Cup Athletics : नीरज चोप्रा, किशोर जेना थेट अंतिम फेरीत ; फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स

भालाफेकीच्या अंतिम फेरीत डीपी मनूने पहिल्याच प्रयत्नात ८२.०६ मीटर लांब भाला फेकत प्रभावी कामगिरी केली होती. त्याने पहिल्याच फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला मागे टाकले. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८२ मीटर लांब भाला फेकला. पहिल्या फेरीत उत्तम पाटील ७५.५५ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर होता.

दरम्यान पहिल्या तीन फेरीपर्यंत डीपी मनू आणि नीरज पहिल्या दोन क्रमांकावर कायम होते. उत्तमला नंतर बिपीन अँटनीने ७७.३७ मीटर भाला फेकत मागे टाकले होते.

चौथ्या फेरीनंतर मात्र बदल झाला. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८२.२७ मीटर लांब भाला फेकत पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे डीपी मनू दुसऱ्या क्रमांकावर घसरला. नंतर त्याला नीरजचे ८२.२७ मीटर अंतर पार करता आले नाही. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

 Neeraj Chopra
Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

दरम्यान, उत्तम पाटीलनेही नंतर ७८.३९ मीटर लांब भाला फेकत तिसरा क्रमांक पुन्हा मिळवला. तो शेवटपर्यंतही तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिला.

तथापि, या स्पर्धेत किशोर जेनाला मात्र फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याला ७६ मीटरचे अंतरही पार करता आले नाही. त्यामुळे भारतासाठी मात्र ही चिंतेची बाब आहे.

सध्या किशोर जेना आणि नीरज हे दोघेही जुलैमध्ये सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. तसेच डीपी मनूही सध्या ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.