Neeraj Chopra : डायमंड लीग २०२३ मध्ये तंदुरुस्त नसतानाही 'सुवर्ण'; नीरज चोप्रा

बुदापेस्टमध्ये होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे, असे नीरजने सुवर्णपदक जिंकल्यावर सांगितले
neeraj plans to achieve peak fitness with focus on world cship in aug
neeraj plans to achieve peak fitness with focus on world cship in augsakal
Updated on

नवी दिल्ली : लौसाने येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत आपण सुवर्णपदक मिळवले खरे, परंतु आपण पूर्णपणे तंदुरुस्त नव्हतो तरीही स्पर्धेत सहभाही होण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने आज मायदेशी येताच उघड केली.

या स्पर्धेत नीरजने ८७.६६ मीटर लांब भाला फेकला. सुवर्णपदक हाती लागले तरी ही कामगिरी त्याच्या वैयक्तिक कामगिरीच्या जवळपासही नव्हती. आता आपण बुदापेस्टमध्ये होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे, असे नीरजने सुवर्णपदक जिंकल्यावर सांगितले होते,

neeraj plans to achieve peak fitness with focus on world cship in aug
Asia Cup Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा होणार सामना? जाणुन घ्या कसे

याचाच अर्थ तो आता लगेचच होणाऱ्या काही स्पर्धांतून माघार घेणार आहे हे स्पष्ट झाले. बुदापेस्ट येथे १९ ते २७ ऑगस्ट दरम्यान जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. यात भालाफेक स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी नियोजित आहे.

लौसाने येथील स्पर्धेत माझी पूर्ण तंदुरुस्ती नव्हती. दुखापतीतून मी पूर्णतः बरा झालेलो नव्हतो. आपण १०० टक्के तंदुरुस्त नाही हे मला स्वतःला जाणवत होते. सुवर्णपदकासाठी किती जोर लावायचा असाही प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला होता, असे नीरजने सांगितले.

neeraj plans to achieve peak fitness with focus on world cship in aug
Women Asia Cup 2023: भारताच्या वाघिणींनी जिंकला आशिया कप! अंतिम फेरीत बांगलादेशला चारली पराभवाची धूळ

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, तेथे सुवर्णपदक मिळण्यासाठी मला पूर्ण तंदुरुस्त होणे आवश्यक आहे, असेही नीरज म्हणाला.

यंदाच्या मोसमातील पहिली डायमंड लीग स्पर्धा ५ मे रोजी दोहामध्ये झाले. त्या स्पर्धेतही नीरजने सुवर्णपदक जिंकले, परंतु त्यानंतर सराव करताना त्याच्या बरगड्याच्या स्नायूंना दुखापती झाली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा,

neeraj plans to achieve peak fitness with focus on world cship in aug
Asia Cup 2023 : आशिया कपच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

आशिया क्रीडा स्पर्धा आणि डायमंड लीग अंतिम स्पर्धा या तीन स्पर्धांमध्ये आपल्याला सुवर्ण यश मिळवायचे आहे त्यासाठी आपण तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही नीरज म्हणाला. माझ्यासाठी पुढची स्पर्धा ऑगस्टमध्ये असल्याने तोपर्यंत तंदुरुस्ती मिळवायला बऱ्यापैकी वेळ आहे, असेही त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.