दिल्ली कॅपिटल्सचा माजी क्रिकेटपटू वादात; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

Nepal Captain And Delhi Capitals Former Player Sandeep Lamichhane Rape Allegation
Nepal Captain And Delhi Capitals Former Player Sandeep Lamichhane Rape Allegationesakal
Updated on

काठमांडू : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या नेपाळच्या संदीप लामिछानेवर एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. संदीपने हा बलात्कार काठमांडूमधील एका हॉटेल रूममध्ये केल्याचा आरोप पीडितेने केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित अल्पवयीन मुलीने गौशाला मेट्रोपॉलिटियन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे. (Nepal Captain And Delhi Capitals Former Player Sandeep Lamichhane Accused Raping Minor Girl)

Nepal Captain And Delhi Capitals Former Player Sandeep Lamichhane Rape Allegation
Asia Cup 2022 : पाकिस्तान - अफगाण राड्यानंतर रमीझ राजा करणार ICC कडे तक्रार

नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या 22 वर्षाच्या लामिछाने काठमांडूच्या हॉटेल रूममध्ये तीन आठवड्यापूर्वी बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. एफआयआरनुसार संदीपने पीडित मुलीला 21 ऑगस्टला काठमांडू आणि भक्तापूरमधील विविध ठिकाणी नेले. त्यानंतर काठमांडूमधील हॉटेल रूममध्ये त्याच रात्री तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ते या प्रकरणातील पुरावे गोळा करत आहेत. यात त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा व्यवस्थित तापस होत नाही तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले.

Nepal Captain And Delhi Capitals Former Player Sandeep Lamichhane Rape Allegation
T20 World Cup : सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडशी भिडणार

संदीप लामिछाने सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहे. संदीप लामिछाने हा आयपीएल खेळणारा पहिला नेपाळचा खेळाडू ठरला होता. त्यावेळी तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल पदार्पण केले होते.

नुकतेच संदीपला नेपाळच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. दरम्यान संदीपने अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याचे आरोप फेटाळले आहेत. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे संदीपचे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. दरम्यान संदीपने क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळच्या अधिकाऱ्यांबरोबर फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी त्याने तो निर्दोष असल्याचे सांगितले. संदीपने कॅरेबियन प्रीमियर लीगनंतर नेपाळला परतणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.