Sandeep Lamichhane News : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यानंतर 10 जानेवारीला त्याला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावन्यात आली. संदीपवर एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला होता.
संदीपची नेपाळ क्रिकेटमधील सर्वात उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना केली जाते आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या देशासाठी खेळणारा तो पहिला खेळाडू देखील बनला होता, ज्यामध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. संदीपवर न्यायालयाच्या निर्णयानंतर आता नेपाळ क्रिकेटनेही त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे.
संदीप लामिछानेला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर नेपाळ क्रिकेटनेही त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर क्रिकेट असोसिएशन नेपाळने या संपूर्ण प्रकरणावर आपले निवेदन जारी केले आणि पीटीआयच्या वृत्तानुसार सांगितले की, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की संदीप लामिछानेला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्ही याला निलंबित करत आहे.
नेपाळच्या न्यायालयाने संदीपला शिक्षा सुनावण्यासोबतच बलात्काराच्या आरोपाखाली 3 लाख नेपाळी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यातील 2 लाख रुपये या प्रकरणातील पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहेत.
या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संदीपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर त्याला नेपाळ क्रिकेट संघाचे कर्णधारपद गमवावे लागले होते. संदीपने 51 एकदिवसीय सामन्यात 112 आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.