ICC ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. सध्या विश्वचषक 2023चे क्वालिफायर सामने झिम्बाब्वेमध्ये खेळले जात आहेत.
विश्वचषक पात्रता फेरीत एकूण 10 संघ सहभागी होत आहेत, तर या क्वालिफायरद्वारे दोन संघ विश्वचषकाच्या मुख्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. पण भारताच्या शेजारी देशाचा संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
क्वालिफायरमध्ये दहा संघ खेळत आहेत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, नेपाळ आणि अमेरिका अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि यूएईचे संघ आहेत. भारताचा शेजारी देश नेपाळचा क्रिकेट संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
24 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या सामन्यात नेपाळला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाने नेपाळचे वनडे विश्वचषक खेळण्याचे स्वप्नही भंगले.
नेपाळच्या संघाला ग्रुप स्टेजमधील 4 सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकता आला. ग्रुप स्टेजच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध नेपाळने प्रथम फलंदाजी केली, परंतु केवळ 167 धावांवर सर्वबाद झाला.
नेपाळकडून कर्णधार रोहित पौडेलने सर्वाधिक 33 धावा केल्या, तर शेवटच्या सामन्यात संदीप लामिछानेने 27 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाने 3 गडी गमावून विजय मिळवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.