New Delhi : विनेश, बजरंग परदेशात सराव करणार

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून एका दिवसात परवानगी
Vinesh Phogat and Bajrang Punia
Vinesh Phogat and Bajrang Puniasakal
Updated on

नवी दिल्ली : बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी आता सरावाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाट व बजरंग पुनिया हे दोन्ही कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय परदेश सराव शिबिरासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात किर्गीजीस्तान व हंगेरी येथे रवाना होणार आहे. दोघांनीही या शिबिरासाठी प्रस्ताव ठेवला होता. केंद्रीय क्रीडा मंत्रालय व टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप्स) यांच्याकडून २४ तासांच्या आत या प्रस्तावावर परवानगी देण्यात आली.

ऑलिंपिक पदकविजेता बजरंग पुनिया किर्गीजीस्तानमध्ये ३६ दिवसांसाठी सराव शिबिराला जाणार आहे. जागतिक पदकविजेती विनेश फोगाट किर्गीजीस्तानमध्ये सात दिवस सराव करणार असून त्यानंतर १८ दिवसांसाठी ती हंगेरी येथे सरावासाठी प्रयाण करणार आहे. परदेश दौऱ्यात बजरंगसोबत प्रशिक्षक सुजीत मान, फिजिओथरपिस्ट अनुज गुप्ता, सहायक जितेंदर आणि एक्स्पर्ट काझी हसन हे असणार आहेत. तसेच फिजिओथेरपिस्ट अश्‍विनी पाटील, सहायक संगीता फोगाट, प्रशिक्षक सुदेश यांच्यासह विनेश परदेश दौरा करणार आहे.

Vinesh Phogat and Bajrang Punia
Mumbai : आयपीएल पोलीस बंदोबस्ताला बंपर सुट! 70 लाखांऐवजी फक्त 10 लाख शुल्क

सरकार, ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टकडून मदत

केंद्र सरकारकडून विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांच्या सहायकांचा खर्च करण्यात येणार आहे. प्रशिक्षक सुदेश व सुजित मान यांचा निवासाचा, शिबिराचा, विमानतळ हस्तांतरणाचा आणि इतर विविध खर्च त्यांच्याकडून करण्यात येणार आहे. विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांच्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांचा खर्च ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.