नवी दिल्ली : भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या(South Africa) एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व केरेल. दरम्यान, रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाच्या स्टाईलबद्दल आणि विराट कोहली (Virat Kohli) बद्दल एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखती दरम्यान काही वक्तव्ये केली. (New India ODI Captain Rohit Sharma Says I Finish My 80 Percent Work Out Side Ground As Captain)
रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० (T 20) मालिकेत कर्णधार म्हणून विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच त्याला एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही मिळाले आहे. विराट कोहली (Virat Kohli) आता फक्त कसोटीचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा टी २० (T 20) आणि एकदिवसीय सामन्यात कर्णधाराची तर कसोटीत उपकर्णधाराची भुमिका बजावणार आहे.
रोहितने बॅक स्टेज विथ बोरिया या यूट्यूब चायनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मैदानात एक कर्णधाराच्या (Captain) रुपात मला फक्त २० टक्केच जोर लावायचा असतो कराण मी माझे ८० टक्के काम मैदानाबाहेर करतो. संघातील खेळाडूंना मैदानाच्या बाहेर देखील तयार करायचे असते. याच शो दरम्यान रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहलीबद्दलही (Virat Kohli) वक्तव्य केले होते. तो विराट बाबत म्हणाला होता की, 'विराट सारख्या फलंदाजाची संघाला कायम गरज असते.'
रोहित शर्मा टी २० क्रिकेटबद्दल बोलताना म्हणाला की, 'सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये ५० च्या सरासरीने धावा करणे हे ऐकूनच अशक्यप्राय वाटते. विराटने जे संघासाठी केले आहे त्याची तुलना होऊ शकत नाही. मात्र कधी कधी बॅड पॅचही येतो आणि त्यातून सावरण्यास वेळ लागतो.'
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने पाच आयपीएल (IPL) ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र एक कर्णधार म्हणून तो कायम मागे राहून संघातील खेळाडूंना पुढे करतो. दरम्यान, आयसीसी स्पर्धांबाबत (ICC Tournament) त्याला विचाले असता त्याने सांगितले की मी एका कोणत्या गोष्टीला दोष देणार नाही. मला वाटते की आम्ही मोठ्या सामन्यांच्या सुरुवातीलाच पाठीमागे पडलो होते. त्याने हे वक्तव्य टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवासंदर्भात केले होते. तो म्हणाला की आम्ही वाईट परिस्थितीसाठी स्वतःला तयार करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.