Glenn Phillips : न्यूझीलंडच्या फिलिप्सने 'मंकडिंग' चुकवण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; VIDEO व्हायरल

Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick
Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick esakal
Updated on

Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील आजच्या (दि.29) सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने खराब सुरूवातीनंतर 20 षटकात 7 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. यात ग्लेन फिलिप्सच्या झुंजार 102 धावांच्या शतकी खेळीचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर ट्रेट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19.2 षटकात 102 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. न्यूझीलंडने 65 धावांनी सामना जिंकत गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान बळकट केले. दरम्यान, सोशल मीडियावर शतकवीर ग्लेन फिलिप्सचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick
NZ vs SL : आशियाई शेर न्यूझीलंडपुढे ढेर! ग्रुप 1 मध्ये किवी अव्वल तर लंका पाचव्या स्थानावर

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 15 धावा अशी केली होती. मात्र त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेलने चौथ्या विकेटसाठी 84 धावांची झुंजार भागीदारी रचत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. त्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या ग्लेन फिलिप्सने आक्रमक फलंदाजी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान, फिलिप्सने टी 20 वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक देखील साजरे केले.

शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना फिलिप्स नॉन स्ट्राईक रन आऊटपासून वाचण्यासाठी एक भन्नाट कल्पना लढवली. त्याने अॅथलेटिक्समधील स्प्रिंटर ज्या प्रकारे आपली रेस सुरू करण्यापूर्वी गार्ड घेतात तसे गार्ड घेतले. गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर तो वेगाने धावत सुटला. दरम्यान, फिलिप्सने नॉन स्ट्राईक रन आऊट होण्यापासून तुम्ही कसे वाचू शकता याचे तंत्रच जगासमोर ठेवले.

Glenn Phillips Non Strike Run Out Unique Trick
Australia Weather : ऑस्ट्रेलियातील T20 वर्ल्डकप पाण्यात; इनडोअर स्टेडियमचं घोडं कुठं अडलं?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या ग्रुप 1 मधील सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये 5 गुणांसह आपले अव्वल स्थान अजून बळकट केले. तर श्रीलंका तीन सामन्यानंतर दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आयर्लंड यांचे प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. इंग्लंड दुसऱ्या, आयर्लंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.