New Zealand Vs Afghanistan : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देत पहिला उलफेर केला. अफगाणिस्तानच्या पावलावर पाऊल ठेऊन नेदरलँडने देखील एक मोठा धमाका केला. त्यांनी स्पर्धेची धडाक्यात सुरूवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची हवाच काढून घेतली.
वर्ल्डकपमधील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांना जबर धक्का बसल्यानंतर आता पुढचा नंबर हा न्यूझीलंडचा असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्ल्डकपचे उपविजेत्या न्यूझीलंडने आपल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव करत फायनलचा वचपा काढला होता.
मात्र चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यात न्यूझीलंडसमोर अफगाणिस्तानचे कडवे आव्हान असणार आहे. चेन्नईच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानचे दर्जेदार फिरकीपटू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
मात्र न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारण्यासाठी अफगाणिस्तान एका खेळाडूच्या कामगिरी अवलंबून राहू शकत नाही. त्यांना संघ म्हणून कामगिरी करावी लागले. सध्या त्यांची सांघिक कामगिरी चांगली होत असल्यानेच न्यूझीलंडसमोर ते तगडे आव्हान उभे करू शकतील.
अफगाणिस्तानची टॉप ऑर्डर बॅट्समन रहमनुल्ला गुरबाज आणि मिडल ऑर्डर फलंदाज इकराम अलीखील यांनी दमदार फलंदाजी केली. त्यानंतर राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी देखील अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंड देखील असा संघ आहे तो सहजासहजी गुडघे टेकत नाही. आतापर्यंत त्यांनी वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सीएसकेचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे हा देखील अफगाणिस्तानसमोरचा मोठा अडसर असणार आहे. मात्र किवींना अजून एक मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात कर्णधार केन विलियमसनच्या बोटाला दुखापत झाल्याने तो वर्ल्डकपला मुकला आहे.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग 11 :
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ड, लोकी फर्ग्युसन
अफगाणिस्तानची संभाव्य प्लेईंग 11 :
रहमनुल्ला गुरबाज, इब्राहिम जादरान, हाश्मतुल्ला शाहिदी, रहमत शाह, इकराम अलीखील, मोहम्मद नबी, अझमतुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहीम, राशिद धान, फजलहक फारूकी, नवीन उल हक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.