IND vs NZ 1st ODI : संजू - उमरानला संधी, भारताची Playing 11 अन् पावसाची शक्यता; जाणून घ्या एका क्लिकवर

India Vs New Zealand 1st ODI Playing 11
India Vs New Zealand 1st ODI Playing 11esakal
Updated on

India Vs New Zealand 1st ODI Playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका उद्यापासून (दि.25) सुरू होत आहे. पहिला वनडे सामना हा ऑकलँड येथे खेळवण्यात येणार असून भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. नुकताच्या झालेल्या टी 20 मालिकेत भारताने 1 - 0 असा विजय मिळवला होता. भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत होता. यावेळी भारतीय संघात संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना संधी मिळावी अशी जोरदार मागणी सोशल मीडियावर झाली होती. मात्र हार्दिकच्या नेतृत्वातील संघात या दोघांनाही संधी मिळाली नव्हती.

India Vs New Zealand 1st ODI Playing 11
Bangladesh vs India : वनडे मालिकेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल; कारण आहे 'राजकीय'

आता शिखर धवनच्या नेतृत्वातील वनडे संघात तरी संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना संधी मिळते का याची उत्सुकता या दोघांच्या चाहत्यांना असणार आहे. याचबरोबर भारत मालिकेतील पहिल्याच वनडे सामन्यात न्यूझीलंडकडून सलग 4 सामन्यात पराभवाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करेल. 3गेल्या दौऱ्यावेळी भारतीय संघाला न्यूझीलंडने 3 - 0 असा व्हाईट वॉश दिला होता.

India Vs New Zealand 1st ODI Playing 11
BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?

अशी असेल पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची playing 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

सामन्यात पावसाची शक्यता?

आज ऑकलंडमध्ये मोठ्याप्रमाणावर पाऊस पडला आहे त्यामुळे मैदान चांगलेच ओले झाले आहे. सामन्याच्या दिवशी जास्त पावसाची शक्यता नसली तरी वातावरण ढगाळ राहणार असल्याने ओलं मैदान डोकेदुखी ठरू शकते.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.