New Zealand vs India 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना आज वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र वेलिंग्टनमध्ये तुफान पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते.
दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना हा रविवारी माऊंट माऊनगनुई येथे खेळवला जाणार आहे. तेथील हवामान अंदाज देखील फारसा काही चांगला नाही. मात्र दोन दिवसात हवामानात काही बदल होईल अशी आशा करायला काही हरकत नाही.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंकडे आपला प्रतिभा दाखवून देण्याची नामी संधी आहे. मात्र पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांची देखील निराशा झाली. जर पावसामुळे सामने रद्द झाले नाहीत तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाची देखील खरी परीक्षा न्यूझीलंड दौऱ्यावर होणार आहे.
वेलिंग्टनमधील पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे स्काय स्टेडिमयवरील फक्त खेळपट्टी झाकण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या टी 20 सामन्यावर पाणी फिरण्याची भीती आहे. दरम्यान, दोन्ही संघांनी फूट व्हॉली खेळण्याचा आनंद घेतला.
वेलिंग्टनमध्ये पावसाची सरूवात झाल्याने नाणेफेकीत उशीर होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.