India vs New Zealand 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पाऊस पडत होता. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबला असला तरी ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला. 4.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस परतला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा दोन्ही डावांतून २१ षटके कापण्यात आली होती. 12.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस परतला आणि सामना रद्द करण्यात आला.
पावसामुळे सामना पुन्हा थांबवण्यात आला आहे. सध्या भारताने 12.5 षटकांत 1 गडी गमावून 89 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल चांगली फलंदाजी करत आहेत. या दोन्ही फलंदाजांनी भारताची धावसंख्या 50 धावा पार केली आहे. पावसामुळे दोन्ही डाव 29-29 षटकांचे करण्यात आले आहेत. भारताने 10 षटकात एक गडी गमावून 60 धावा केल्या. त्याचवेळी, 11 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 69 धावांवर पोहोचली आहे. सूर्यकुमार यादव 17 तर शुभमन गिल 42 धावा करत खेळत आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे.
भारतीय कर्णधार शिखर धवन 10 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. मॅट हेन्रीच्या चेंडूवर त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. पावसानंतर धवन झटपट धावा करण्याच्या इराद्याने क्रीझवर आला, पण त्याला यश आले नाही. गेल्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली, मात्र या सामन्यात त्याला काही विशेष करता आले नाही. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 25 अशी आहे.
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामन्याची षटके कमी करण्यात आली आहेत. आता 29-29 षटकांचा सामना होणार आहे, डावात 10 मिनिटांचा ब्रेक असेल तर ड्रिंक्स ब्रेक नसेल. सततच्या पावसामुळे पंचांना ओव्हर कमी करणे भाग पडले आहे. टीम इंडिया सध्या 4.5 षटकात एकही विकेट न गमावता 22 धावांवर खेळत आहे.
हॅमिल्टनमध्ये पाऊस वेगळा खेळ खेळत आहे. येथे पुन्हा पाऊस थांबला. अशा स्थितीत आता सामना सुरू होईल, अशी अपेक्षा असली तरी षटके कमी होण्याचा धोका आहे.
खेळपट्टीच्या पाहणीच्या १० मिनिटे आधी पुन्हा पाऊस सुरू झाला. खेळपट्टीवर कव्हर्स परत आणण्यात आले आहेत. खेळपट्टी तपासणीला पुन्हा विलंब होईल.
हॅमिल्टनहून चांगली बातमी येत आहे. पाऊस थांबला आहे आणि खेळपट्टीवरून कव्हर काढले आहेत. पावसाचा परिणाम आऊटफिल्डवर झाला असून मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. अंपायर मैदानाच्या मधोमध असून त्याचे निरीक्षण करत आहे.
हॅमिल्टनमधला पाऊस पाहता तो लवकर थांबेल असे वाटत नाही. आता सामना होणार नाही, असे वाटल्याने चाहते स्टेडियममधून परत जाऊ लागले आहेत.
हॅमिल्टनमध्ये पाऊस हलका झाला आहे. कदाचित तो थोड्या वेळाने थांबेल आणि सामना सुरू होईल. सामन्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ आहे. याशिवाय 20 मिनिटांचा डावाचा ब्रेकही आहे.
पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपूर्वीच पाऊस सुरू झाला. हलका पाऊस असूनही सामना सुरू होता, मात्र पावसाचा जोर वाढताच खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगण्यात आले.
भारतीय संघाची फलंदाजी सुरू झाली आहे. शिखर धवन आणि शुभमन गिल ही जोडी क्रीझवर आहे. न्यूझीलंडसाठी टीम साऊदीने पहिले षटक टाकले. दोन षटकांअखेर भारताची धावसंख्या बिनबाद सात आहे.
भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा संघात समावेश करण्यात आला असून शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.