IND vs NZ 3rd ODI : तिसरा एकदिवसीय सामनाही पावसामुळे रद्द

IND vs NZ 3rd ODI
IND vs NZ 3rd ODIsakal
Updated on

New Zealand vs India 3rd ODI Cricket Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आजक्राइस्टचर्च येथे खेळल्या गेला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाला 219 धावांवर गारद केले. प्रत्युत्तर न्यूझीलंडने 18 षटकांत एक गडी गमावून 104 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पाऊस आला आणि पुढील सामना होऊ शकला नाही. मैदान ओले झाल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पावसामुळे सामना थांबला

पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताणा 18 षटकांत एक विकेट गमावून 104 धावा केल्या आहेत. फिन अॅलन 57 धावा करून बाद झाला. त्याचवेळी डेव्हन कॉनवे 51 चेंडूत 38 धावा केल्यानंतर नाबाद आहे. कर्णधार विल्यमसनने केवळ तीन चेंडू खेळले असून त्याचे खाते अद्याप उघडलेले नाही. जरी या सामन्यात न्यूझीलंडची पकड खूप मजबूत आहे आणि हा संघ डकार्थ-लुईस नियमानुसार पुढे आहे, परंतु एकदिवसीय सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी दोन्ही डावात किमान 20-20 षटके आवश्यक आहेत. जर सामना झाला नाही तर तो रद्द होईल आणि किवी संघ 1-0 ने मालिका जिंकेल.

फिन ऍलनचे अर्धशतक

या सामन्यात किवी संघाचा सलामीवीर फिन ऍलनने अर्धशतक पूर्ण केले आहे. ऍलनने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 50 चेंडूंचा सामना केला. त्याने या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे. न्यूझीलंडच्या धावसंख्या 16 षटकांनंतर बिनबाद 93.

न्यूझीलंडची संथ सुरुवात

220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात संथ झाली. फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे सावधपणे फलंदाजी करत आहेत आणि मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यूझीलंडने पाच षटकांनंतर बिनबाद 15 धावा केल्या आहेत.

सुंदर आउट, भारताचा डाव 219 धावांवर आटोपला

सुंदर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अवघ्या 2 चेंडूत बाद झाला. साऊदीने त्याला लॅथमकरवी झेलबाद केले. सुंदरने 51 धावा केल्या, यासह भारताचा डाव 47.3 षटकात 219 धावांवर आटोपला. भारताने न्यूझीलंडला 220 धावांचे लक्ष्य दिले आहे.

भारतीय संघाला सातवा धक्का

भारतीय संघाला सातवा धक्का बसला आहेत. दीपक हुड्डानंतर दीपक चहरही 12 धावा करून बाद झाला असून टीम इंडियाने 7 विकेट गमावल्या आहेत. भारताची धावसंख्या 36.3 षटकात 170/7 झाली आहे.

हुड्डा आउट! भारताला 149 धावांवर सहावा धक्का

34व्या षटकात टीम साऊदीच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुड्डा आउट झाला. भारताच्या 6 विकेट 149 धावांवर पडल्या आहेत.

तिसऱ्या वनडेत टीम इंडियाची वाईट परिस्थिती

भारताने 30 षटकात 5 विकेट गमावत 135 धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर 9 आणि दीपक हुडा 6 धावा करून खेळत आहेत.

अय्यरचे अर्धशतक हुकले, 49 धावांवर बाद

भारताचा निम्मा संघ 121 धावांच्या स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारताला पाचवा धक्का श्रेयस अय्यरच्या रूपाने बसला आहे. त्याला लॉकी फर्ग्युसनने डेव्हन कॉनवेच्या हाती झेलबाद केले. श्रेयसने 59 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या.

सूर्यकुमार यादव सहा धावा करून बाद

110 धावांच्या स्कोअरवर भारताला चौथा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव 10 चेंडूत 6 धावा करून बाद झाला आहे. अॅडम मिल्नेने त्याला टिम साऊदीकरवी झेलबाद केले. 25 षटक संपल्यानंतर भारतीय संघाने 4 गडी गमावून 116 धावा केल्या आहेत.

पंत पुन्हा फ्लॉप 

ऋषभ पंत पुन्हा फ्लॉप राहिला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो अवघ्या 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 16 चेंडूंचा सामना केला.

भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये 

भारताचे दोन्ही सलामीवीर 55 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. शुभमन गिलनंतर शिखर धवनही 45 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

टीम इंडियाला पहिला धक्का, शुभमन गिल 13 धावा करून आऊट

टीम इंडियाला तिसऱ्या वनडेत पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल यावेळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, अॅडम मिलने त्याला झेलबाद केले. या डावाच्या सुरुवातीपासून शुभमन लयीत दिसत नव्हता आणि त्याने लवकरच त्याची विकेट गमावली. भारताची धावसंख्या 8.4 षटकात 39/1

भारताची फलंदाजी सुरु

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात संथ झाली. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता सात धावा आहे. शिखर धवन आणि शुभमन गिल या जोडीने या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये संथ सुरुवात केली आहे पण चांगली भागीदारी केली आहे.

भारतीय संघाची प्लेइंग- 11

भारत: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

भारताची पहिली फलंदाजी

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी न्यूझीलंड संघात मायकेल ब्रासवेलच्या जागी अॅडम मिल्ने संघात परतला आहे. दुखापतीमुळे तो दुसरा सामना खेळू शकला नाही.

टीव्हीवर सामना फ्री कसा बघायचा?

न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे एकदिवसीय सामने प्रसारित करण्याचे अधिकार डीडी स्पोर्ट्सकडे आहेत. हे फक्त डीडी फ्री डिशवर आहे. तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला काही व्यवस्था करावी लागेल. तुमच्याकडे डीडी फ्री डिश असल्यास, तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. जर तुमच्याकडे फ्री डिश नसेल तर तुम्ही 'फायर स्टिक'द्वारे अॅमेझॉन प्राइम टीव्हीवर थेट सामने पाहू शकता. डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.