NZ vs PAK : सेमी फायनलच्या आशा कायम! फखर जमान अन् पावसानं पाकिस्तानला तारलं

New Zealand vs Pakistan World Cup 2023
New Zealand vs Pakistan World Cup 2023sakal
Updated on

New Zealand vs Pakistan World Cup 2023 : दरवेळेप्रमाणेच पुन्हा एकदा अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने सेमी फायनलच्या आशा कायम ठेवल्या आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये टिकून राहण्यासाठी पाकिस्तानने करो या मरो या सामन्यात न्यूझीलंडचा 21 धावांनी (डकवर्थ-लुईस नियम) पराभव केला. अशाप्रकारे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा अजून पण आहे, तर सलग चौथ्या पराभवानंतरही न्यूझीलंड अजूनही शर्यतीत आहे. पाकिस्तानच्या या महत्त्वाच्या विजयात फखर जमानचा मोठा वाटा होता.

New Zealand vs Pakistan World Cup 2023
Who is Fakhar Zaman : पाकिस्तानी फखर जमान रचला इतिहास! २०१७ साली पळवला होता भारताच्या तोंडचा घास

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पण कॉनवे 39 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. यानंतर दुखापतीतून परतणाऱ्या केन विल्यमसनने रचिन रवींद्रसोबत 180 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, रचिनने या वर्ल्ड कपमधील तिसरे शतक ठोकले. एकाच वर्ल्ड कपमध्ये तीन शतके ठोकणारा रचिन न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. तर विल्यमसन 79 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा करून बाद झाला.

New Zealand vs Pakistan World Cup 2023
Hardik Pandya : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का! उपकर्णधार स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

शतक झळकावल्यानंतर रचिननेही आऊट झाला, त्याने 94 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या. यानंतर डॅरिल मिशेलने 18 चेंडूत 29 धावा, मार्क चॅपमनने 27 चेंडूत 39 धावा, ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 41 धावा केल्या.

तर मिचेल सँटनर 17 चेंडूत 26 धावा करून नाबाद राहिला आणि टॉम लॅथम 2 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात पाकिस्तानकडून वसीमशिवाय हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. शाहीन आफ्रिदीने या सामन्यात 90 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. 24 एकदिवसीय डावात शाहीन आफ्रिदी विकेट रहित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना 25.3 षटकात पाकिस्तानची धावसंख्या 200/1 होती. यानंतर पावसाने खेळ खराब केला आणि पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 21 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानकडून फखर जमानने 81 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने 63 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.