NZ vs PAK : न्यूझीलंडच्या 400 वर पावसाचे पाणी; DLS चं गणित पाकिस्तानच्या फायद्याचं?

New Zealand vs Pakistan World Cup 2023 Rain stops play in Bengaluru PAK 10 runs ahead on DLS
New Zealand vs Pakistan World Cup 2023 Rain stops play in Bengaluru PAK 10 runs ahead on DLSsakal
Updated on

New Zealand vs Pakistan World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या 35व्या सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी खेळला जात आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हरणाऱ्या संघासाठी पुढील वाटचाल अवघड असणार आहे. त्याच वेळी, विजेता संघ अंतिम चारसाठी दावा करेल.

पाकिस्तानने मागील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ मागील तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 401 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले तेव्हा किवी संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 401 धावा केल्या. युवा फलंदाज रचिन रवींद्रने 108 धावा केल्या. त्याचे या वर्ल्ड कपमधली हे तिसरे शतक आहे. कर्णधार विल्यमसननेही 95 धावांची खेळी केली.

पण न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत पाकिस्तानने 21.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 160 धावा केल्या होत्या. फखर जमान 69 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 106 धावा तर कर्णधार बाबर आझम 51 चेंडूत 47 धावा करून खेळत आहे.

डकवर्थ लुईस नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास पाकिस्तान सामना जिंकेल. कारण डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान न्यूझीलंडपेक्षा 10 धावांनी पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.