NZ Vs SL WTC 2023: नेहमी भारतासाठी अपशकुन करणारी न्यूझीलंड शेवट बॉल मध्ये भारताला फायनलमध्ये पोहचवून गेली

...अन् टीम इंडिया फायनलमध्ये
New Zealand vs Sri lanka WTC 2023
New Zealand vs Sri lanka WTC 2023
Updated on

New Zealand vs Sri lanka WTC 2023 : आज सकाळ क्रिकेट चाहत्याते प्रश्नांनी घेरलेली होती की भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल का? श्रीलंका न्यूझीलंडमध्ये इतिहास रचणार का? एकीकडे अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता, तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील क्राइस्टचर्चमधील पहिल्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमांचक कसोटी सामना जो क्राइस्टचर्चमध्ये पाहायला मिळाला.

New Zealand vs Sri lanka WTC 2023
IND vs AUS: टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी! ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा टेकले गुडघे

आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड अनेकदा भारताचे स्वप्न भंग करताना दिसत आहे, परंतु यावेळी टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा चमत्कार कसा घडला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट चाहत्यांनी कसा श्वास रोखून धरला... क्राइस्टचर्च सामन्याच्या थराराची कहाणी.....

New Zealand vs Sri lanka WTC 2023
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉ! मालिका 2-1ने टीम इंडियाच्या खिशात

क्राइस्टचर्च कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 285 धावांचे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या दिवशी हे लक्ष्य गाठणे अवघड असले तरी अशक्य नव्हते. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने शतक झळकावले, तर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या डिरेल मिशेलनेही तुफानी फलंदाजी केली.

शेवटच्या 20 षटकांत न्यूझीलंडला विजयासाठी 150 धावांची गरज असताना त्यांनी फलंदाजीचा गियर बदलला आणि तुफानी फलंदाजी सुरू केली. त्याचे नेतृत्व डिरेल मिशेलने केले, ज्याने 81 धावांच्या खेळीत 3 चौकार 4 षटकार ठोकले. केन विल्यमसनसोबत डिरेल मिशेलने केवळ 157 चेंडूत 142 धावांची भागीदारी केली.

New Zealand vs Sri lanka WTC 2023
VIDEO: 'मी असतो तर नक्की OUT...' LIVE मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरला लगावला टोला अन्...

कसोटी सामन्याच्या शेवटच्या 3 षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती. म्हणजे 18 चेंडूत 20 धावा. न्यूझीलंडने पहिल्या षटकात एक विकेट गमावून 5 धावा केल्या, दूसऱ्या षटकातही असेच घडले. न्यूझीलंडने 7 धावा केल्या आणि एक विकेट गमावली. म्हणजेच शेवटच्या षटकात न्यूझीलंडला 7 धावांची गरज होती आणि त्यांच्या फक्त 3 विकेट शिल्लक होत्या.

न्यूझीलंडचा शेवटच्या षटकातील थरार...

  • शेवटच्या षटकात केन विल्यमसनचा स्ट्राईक होता, पण त्याने पहिल्याच चेंडूवर एकच धाव काढली.

  • दुसऱ्या चेंडूवर मॅट हेन्रीने एकच धाव घेतली.

  • तिसऱ्या चेंडूवर केन विल्यमसन स्ट्राइक वर आला. दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात मॅट हेन्री धावबाद झाला.

  • आता शेवटच्या 3 चेंडूंवर 5 धावा हव्या होत्या, केन विल्यमसनने चौथ्या चेंडूवर चौकार मारला आणि धावसंख्या बरोबरी झाली.

  • येथे शेवटच्या दोन चेंडूंवर एक धाव हवी होती, पण ओव्हरचा पाचवा चेंडू डॉट गेला.

  • आता एका चेंडूवर फक्त एक धाव हवी होती. श्रीलंकेने संपूर्ण मैदान विकेटच्या भोवती घेरा घातला, पण केन विल्यमसन शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. अशा प्रकारे रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.