BCCI President Roger Binny Statement Over India Not Visit Pakistan : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारत आशिया कप 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तीळपापड झाला होता. त्यानंतर पीसीसीबीने पाकिस्तान 2023 चा भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची भाषा करू लागाला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रॉजर बिन्नी म्हणाले की, 'हा आमचा निर्णय नाही. आम्ही आमचा संघ कोठे जाईल हे सांगू शकत नाही. आम्हाला देश सोडताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. याचबरोबर इतर देश भारतात येण्यासाठी देखील सरकारची परवानगी घ्यावी लागते. आम्ही याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही यासाठी सरकावर अवलंबून असतो.' रॉजर बिन्नी हे बीसीसीआयच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला रवाना होणार की नाही या वादाबाबत आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याच्या धमकीचा खरपूस समाचार घेतला. अनुराग ठाकूर म्हणाले की, बीसीसीआयच याचे उत्तर देईल आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक पाकिस्तानमधून हलवण्याबाबत केलेल्या टिप्पणीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. बीसीसीआयच्या बैठकीनंतर सचिव जय शाह यांनी आशिया चषक दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्याबाबत भाष्य केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.