Neymar : क्रोएशियाकडून झालेला पराभव जिव्हारी; नेमारने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

Neymar Retirement Brazil
Neymar Retirement Brazilesakal
Updated on

Neymar Retirement Brazil : सर्वाधिवेळा फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ब्राझीलला क्वार्टर फायनलमध्येच आपला गाशा गुंडळावा लागला. कतारमध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 च्या पहिल्याच क्वार्टर फायनलमध्ये गवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाने ब्राझीलचा पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4 - 2 असा पराभव करत सेमी फायनल गाठली. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या सामन्यात ब्राझीलकडून नेमानरे सामन्यातील पहिला गोल केला. मात्र क्रोएशियाच्या ब्रुनो पेतकोविचने 117 व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पेनाल्टी शूटआऊटमध्ये मास्टर असलेल्या क्रोएशियाने ब्राझीलला 4 - 2 अशी मात दिली. ब्राझीलने संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ केला. मात्र तरी देखील ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर दुःखी झालेल्या नेमारने एक मोठे वक्तव्य केले.

Neymar Retirement Brazil
Fifa World Cup : फिफात कोण जिंकणार? प्राणी सांगतायत, फिफाचं भविष्य

नेमार सामना झाल्यानंतर म्हणाला की, 'मी कोणताही दरवाजा बंद केलेला नाही. मात्र मी शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही की मी राष्ट्रीय संघात परतेन.' 30 वर्षाचा नेमार पुढे म्हणाला की, 'मला याबाबत अधिक विचार करावा लागले. माझ्यासाठी आणि ब्राझील संघासाठी काय योग्य आहे हे ठरवावे लागले.' नेमारने याच सामन्यात ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या ब्राझीलकडून सर्वाधिक 77 गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Neymar Retirement Brazil
Lionel Messi Angry: मेस्सीला राग का आला! सामन्यानंतर नेदरलँडच्या कोचशी भिडला

नेमार म्हणतो की, 'ही खूप विचित्र फिलिंग आहे. मला वाटते की गेल्या वर्ल्डकपमध्ये जे झाले त्यापेक्षा ही जास्त वाईट फिलिंग आहे. या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीयेत.' दरम्यान, ब्राझीलचे कोच टिटे म्हणाले की, 'आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली आणि मला माझ्या संघ सहकाऱ्यांचा अभिमान आहे. त्यांनी ज्या प्रकारे पेनाल्टी घेण्यात पुढाकार घेतला तो चांगला होता. हा एक वेदनादायी पराभव आहे. मात्र मी शांतते जात आहे. माझी भुमिका संपली आहे.' टिटे यांनी या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा : Credit Score : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.