Boxing Championships : भारतीय बॉक्सर्सची घोडदौड कायम

यजमान भारतीय संघातील महिला खेळाडूंची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील घोडदौड मंगळवारी कायम राहिली
निखत झरीन, नीतू घंघास
निखत झरीन, नीतू घंघासsakal
Updated on

नवी दिल्ली : यजमान भारतीय संघातील महिला खेळाडूंची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील घोडदौड मंगळवारी कायम राहिली. निखत झरीन, नीतू घंघास, मनीषा माऊन, जास्मिन लाम्बोरिया या भारतीय महिलांनी प्रतिस्पर्ध्याना नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शशी चोप्रा हिला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

गतविजेती निखत हिने ५० किलो वजनी गटात मेक्सिकोच्या फातिमा हिरेरा हिच्यावर सहज विजय नोंदवला. निखतने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. फातिमा हिने आपला खेळ बदलत निखतवर

वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला; पण निखतच्या आक्रमक खेळापुढे ती निष्प्रभ ठरली. अखेर रेफ्रींकडून निखतला विजयी घोषित करण्यात आले. आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिच्यासमोर चुतमत रक्षात हिचे आव्हान असणार आहे.

निखत झरीन, नीतू घंघास
Pune News: ओशो अनुयायांत आरोप-प्रत्यारोप

नीतू हिने ४८ किलो वजनी गटाच्या लढतीत दमदार खेळ केला. तिने ताजिकिस्तानच्या सुमैया कोसीमोवा हिच्यावर विजय साकारला. नीतू हिने सुरुवात सावध केली; पण सहा मिनिटांच्याआधी रेफ्रींकडून लढत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. नीतूने सुमैया हिच्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवले, नीतूला जपानच्या

निखत झरीन, नीतू घंघास
Pune News: जास्त तापमानाचा हापूसला फटका

मनीषा हिने ५७ किलो वजनी गटात तुर्कीच्या नूर तूरहान हिचा पराभव केला. मनीषा हिने मागील जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावले होते. यंदा तिला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या अमिना झिदानी हिचा सामना करावयाचा आहे. जास्मिनने ६० किलो वजनी गटात ताजिकिस्तानच्या मिजगोना सामादोवा हिला ५-० असे नमवले व अंतिम आठमध्ये प्रवेश केला. शशी चोप्रा हिला मात्र ६३ किलो वजनी गटात जपानच्या मेई कितो हिच्याकडून ४- असे पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.