बिजींग IOC अधिवेशनात नीता अंबानी; CM उद्धव ठाकरेंचा खास मेसेज

Nita Ambani attend  International Olympic Committee 139 th session
Nita Ambani attend International Olympic Committee 139 th session Sakal
Updated on

बिजींग येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे 139 वे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या आणि प्रसिद्ध व्यावसायिक नीता अंबानी (Nita Ambani) या भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या अधिवेशनात भारत 2023 मध्‍ये मुंबईत (Mumbai) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (IOC) अधिवेशन सत्रासाठीचा प्रस्ताव सादर करणार आहे. आयओसी सदस्य नीता अंबानीसह भारताकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर हे देखील अधिवेशनामध्ये सहभागी असतील.

2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे आयोजन करणं ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची बाब नाही तर भारताच्या क्रीडा क्षेत्राला क्षितिजावर पुढे नेण्याची ही एक उत्तम संधी देखील आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे यजमानपद महाराष्ट्रातील मुंबईला मिळावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नीता अंबानी यांचे आभार, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.