Nitish Rana Ranji Trophy : राणा तू आयपीएलच खेळ! केकेआरच्या खेळाडूला दिल्लीने रणजी संघातून दिला नारळ

Nitish Rana Ranji Trophy KKR
Nitish Rana Ranji Trophy KKRESAKAL
Updated on

Nitish Rana Ranji Trophy KKR : भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू झाला आहे. देशातील विविध राज्यांचे रणजी संघ या हंगामात पुढच्या सामन्यासाठी सज्ज होत आहे. याचदरम्यान, दिल्ली क्रिकेट असोसिएशनने तामिळनाडूविरूद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला. दिल्लीने आयपीएल स्टार डावखुरा फलंदाज नितीश राणाला रणजी संघातून नारळ दिला. यासाठी त्यांनी नितीशच्या आयपीएल प्रेमाचे कारण दिले.

Nitish Rana Ranji Trophy KKR
Cameron Green : एवढी बोली लागण्यासारखं मी केले तरी काय... मुंबई इंडियन्सला घरचा आहेर

नितीश राणा हा 2016 पासून कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतोय. त्याने केकेआरच्या संघात आपले स्थान मजबूत केले आहे. याचबरोबर नितीश राणा भारताकडून एक वनडे आणि दोन टी 20 सामने देखील खेळला आहे. मात्र अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूला दिल्लीच्या रणजी संघातून काढून टाकण्यात आले.

याबाबत दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधील लोकांचे म्हणणे आहे की नितीश राणाचे संपूर्ण लक्ष हे आयपीएल खेळण्याकडे आहे. त्याला तेथे करोडो रूपये मिळत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीकडून खेळणे ही प्राथमिकता नाही. या निर्णयानंतर दिल्ली क्रिकेट रणजी संघांचे निवडसमिती अध्यक्ष गगन खोडा यांच्यावर देखील टीका होत आहेत.

Nitish Rana Ranji Trophy KKR
David Warner VIDEO : डेव्हिड वॉर्नर ऐतिहासिक डबल धमाका; मात्र लगेचच का सोडावं लागले मैदान?

नितीश राणाची गेल्या वर्षातील कामगिरी

नितीश राणाने गेल्या वर्षी केकेआरकडून आयपीएलमध्ये सामने खेळले. त्यात त्याने 27.77 च्या सरासरीने 361 धावा केल्यात. राणाचे स्ट्राईक रेट 143.82 इतके होते. गेल्या हंगामात नितीश राणाने 2 अर्धशतके देखील ठोकली. राणाने आयपीएलमधील सर्वोकृष्ट कामगिरी ही 2016 मध्ये केली होती. त्याने 4 सामन्यात 34.66 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तर 2019 मध्ये त्याने 14 सामन्यात 34.40 च्या सरासरीने 344 धावा केल्या होत्या. यानंतर त्याची सरासरी ढासळत आहे. (Sports Latest News)

नितीश राणा केकेआरशी 2018 पासून जोडला गेला आहे. तेव्हापासून त्याने करारानुसार मिळणाऱ्या रक्कमेतूनच 30 कोटींची कमाई केली आहे. 2018 ते 2021 पर्यंत नितीश राणाला केकेआरकडून वर्षाला 3.40 कोटी रूपये मिळतात. गेल्या दोन वर्षात त्याची ही रक्कम वाढून 8 कोटी इतकी झाली आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.