IND vs SA T20 : टीम इंडियाचा बायो बबलला 'बाय - बाय'

No Bio Bubble For Team India in South Africa Series
No Bio Bubble For Team India in South Africa Series esakal
Updated on

मुंबई : आयपीएलचा महाकुंभमेळा संपल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी (South Africa Series) तयारी करत आहे. ही मालिका 9 जून पासून सुरू होणार असून दिल्लीत मालिकेतला पहिला सामना होणार आहे. या मालिकेत स्टेडियममध्ये प्रेक्षक संख्या पूर्ण क्षमतेने असणार आहे. याचबरोबर आता टीम इंडिया (Team India) कोणत्याही बायो बबलमध्ये (Bio Bubble) असणार नाही. बीसीसीआयने टीम इंडियाचा बायो बबलमधून मुक्तता केली आहे.

No Bio Bubble For Team India in South Africa Series
Hansie Cronje: 'त्या' प्लेनक्रॅश बरोबरच मॅचफिक्सिंगचे सर्व काळे रहस्य गाडले गेले

जेव्हापासून कोरोनाच्या साथरोगाने जगाला विळखा घातला होता तेव्हापासून सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक होते. या कठिण काळात क्रीडा विश्वातील मोठमोठ्या स्पर्धा बायो बबलमुळे आयोजित करणे शक्य झाले. आता भारतीय संघ कोरोना साथरोग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बायो बबलविना एखादी मालिका खेळणार आहे. असे असले तरी खेळाडूंनी नियमितपणे कोरोनाची चाचणी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला टी 20 सामना 9 जूनला दिल्लीत होणार आहे. तर दुसरा सामना 12 जूनला कटक, तिसरा सामना 14 जूनला विशाखापट्टणमला, चौथा सामना 17 जूनला राजकोट तर पाचवा सामना बंगळुरूमध्ये 19 जूनला होणार आहे.

No Bio Bubble For Team India in South Africa Series
दुखऱ्या पायाने जोकोविचला मात देणारा नदाल सेमी फायनलबद्दल म्हणतो...

भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत खेळणार नाही. बीसीसीआयने त्याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेत रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराहला देखील विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20 मालिका सुरू असतानाच रोहित शर्माच्या नेतृत्वातील कसोटी संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत एक कसोटी आणि प्रत्येकी 3 वनडे आणि टी 20 सामने खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.